Naseeruddin Shah Makes Shocking Claims: ‘लग्नाआधी नशेत असायचो...’ प्रेमाला विरोध..; नसिरुद्दीन यांनी सांगितली प्यारवाली लव्हस्टोरी

Naseeruddin Shah And Ratna Pathak Love Life: नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत आपल्या लव्ह लाईफबद्दल हा खुलासा केला आहे.
Naseeruddin Shah Makes Shocking Claims
Naseeruddin Shah Makes Shocking ClaimsSaam Tv
Published On

Naseeruddin Shah Makes Shocking Claims: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह नेहमीच आपल्या अभिनयासोबतच काही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. सर्वाधिक प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेले नसिरूद्दीन शाह यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सिनेसृष्टीत निर्माण केलीय. सध्या नसिरूद्दीन शाह आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आले आहेत. नसिरुद्दीन शाह यांनी त्यांची पत्नी रत्ना पाठकसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं.

Naseeruddin Shah Makes Shocking Claims
Sunil Lahri On Adipurush: रावणाची हेअरस्टाइल विराट कोहलीसारखी, ही शरमेची बाब; आदिपुरुषवर 'लक्ष्मण' संतापले

नसिरूद्दीन शाह हे पाहता क्षणीच रत्ना पाठक यांच्या प्रेमात पडले होते. पण लता यांचे कुटुंबीय त्यांच्या नात्याच्या विरोधात होते. कारण ते ड्रग्ज व्यसनी, रागीट स्वभाव आणि घटस्फोटित होते. खुद्द नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत आपल्या लव्ह लाईफबद्दल हा खुलासा केला आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “आम्ही एकत्र राहत नव्हतो, पण एकमेकांवर प्रेम करत होतो. लग्नापूर्वी आम्ही ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. तिचे आईवडील लग्नाच्या विरोधात होते, कारण मला अंमली पदार्थांचा व्यसनी होतो. माझे एक लग्न देखील झाले होते. यावरून मला अनेकदा नातेवाईक किंवा इतरर लोकं बोलायचे.मी रागीट स्वभावाचा असल्याने माझ्याकडे सहसा कोण लक्ष देत नव्हतं.”

नसीरुद्दीन शाह यांनी पुढे सांगितले की, “रत्नाला पहिल्यांदाच पाहून मी तिच्या प्रेमात पडलो. आम्ही भेटलो तेव्हा मी माझा पहिला चित्रपट केला होता. त्यावेळी रत्ना सत्यदेव दुबे यांच्या नाटकात काम करत होती आणि तेव्हाच मी एका चित्रपटात काम देखील केले होते. मला असं वाटत होतं की, रत्नाबद्दल अजून माहिती जाणून घ्यावी. तिच्याबद्दल माहिती जाणून घेणे ही बाब माझ्यासाठी फार महत्वाची होती. आम्ही दोघांनीही एकमेकांना चांगल्या आणि वाईट काळात साथ दिली होती.”

नसिरुद्दीन आणि रत्ना यांच्यातील नाते इतके घट्ट होते की ते नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र म्हणून राहिले. जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रत्ना आणि नसीरुद्दीन यांनी २ एप्रिल १९८२ मध्ये लग्नगाठ बांधली. नसिरूद्दीन आणि रत्ना यांना एक मुलगी हिबा शाह तर इमाद शाह आणि विवान शाह अशी दोन मुले आहेत. दोघेही मुलं अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे.

Naseeruddin Shah Makes Shocking Claims
Aai Kuthe Kay Karte Serial Update: अनिरूद्धचं भांडं फुटलं, नितीनने सांगितला आशुतोष- अरूंधतीला सगळं प्रकरण...

७२ वर्षीय नसीरुद्दीन शाह यांचे लग्न सर्वात आधी दिवंगत अभिनेत्री सुरेखा सिक्री यांची बहिण मनारा सिक्रीसोबत झाले होते. त्यांची पहिली पत्नी १५ वर्षे मोठी होती.पण त्यांच्यातील काही मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले. ज्या वर्षी त्यांचा घटस्फोट झाला त्याच वर्षी मनारा सिक्री यांचे निधन झाले. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर नसीरुद्दीन शाह यांनी रत्ना पाठक शाह यांच्याशी लग्नगाठ बांधली. नसीरुद्दीन शाह अलीकडेच रिलीज झालेल्या ZEE5 पीरियड ड्रामा 'ताज' मध्ये दिसले होत. ज्यामध्ये त्यांनी सम्राट अकबराची भूमिका केली होती. तर ६६ वर्षीय रत्ना पाठक शाह यांनी 'कच्छ एक्स्प्रेस' या चित्रपटातून गुजराती सिनेसृ्ष्टीत पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com