Adipurush controversy: 'आदिपुरुष' चित्रपटावरुन (Adipurush Movie) सध्या वाद सुरु आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या संवादावरुन वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या विरोधात देशभरात निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत. या चित्रपटावर सध्या टीकेची झोड सुरु आहे.
अशामध्ये प्रसिद्ध रामायण मालिकेमध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी (Actor Sunil Lahri) हे या चित्रपटावर संतप्त झाले आहेत. चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानची (Saif Ali Khan) तुलना त्यांनी क्रिकेटर विराट कोहलीशी (Virat Kohli) केली आहे.
एकीकडे आदिपुरुष चित्रपटावर जोरदार टीका होत आहे तर दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट जितकी कमाई करत आहे तितकाच गोंधळ वाढत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली दृश्य आणि संवाद वादग्रस्त ठरली आहेत. अशामध्ये अभिनेते सुनील लहरी यांनी या चित्रपटामध्ये रावणाच्या हेअरस्टाइलवर टीका केली आहे. आदिपुरुषमध्ये 'रावणाची हेअरस्टाइल विराट कोहलीसारखी दिसते ही शरमेची बाब आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
नुकताच सुनील लहरी यांनी एका मुलाखतीदरम्यान आदिपुरुष या चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त केले. चित्रपटातील पात्रांबद्दल त्यांनी मोकळेपणाने आपले मत मांडले. 'राम आणि लक्ष्मण यांच्या पात्रांमध्ये फारसा फरक नाही. दोघेही सारखेच दिसत आहेत आणि त्यांचे वागणे देखील सारखेच आहे. तर रावण लोहारासारखा दिसतो जो लोखंडाला मारताना दिसतो.याची काय गरज होती.', असा सवाल त्यांनी केला आहे
या चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषा आणि लूकबद्दल बोलताना सुनिल लहरी यांनी सांगितले की, 'या चित्रपटात अनेक पात्रांची केशरचनाही विचित्र दिसत आहे. रावणाचा हेअरकट भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या हेअरकटसारखा दिसत आहे.ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.', असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, या चित्रपटात प्रभासने प्रभू रामाची भूमिका साकारली असून सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. तर सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली असून बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.