BJP on Adipurush : भावना दुखवायचा अधिकार कोणालाच नाही; 'आदिपुरूष'बाबत केंद्रातील भाजप सरकार कठोर

Adipurush Controversy : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' चित्रपटावर सध्या चौफेर टीका होत आहे.
BJP on Adipursh
BJP on AdipurshSaam Tv
Published On

Adipurush Banned : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' चित्रपटावर सध्या चौफेर टीका होत आहे. सोशल मीडियावर नेटकरी या चित्रपटाला प्रचंड ट्रोल करत आहेत. या चित्रपटातील काही दृश्ये आणि संवादावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. चित्रपटाच्या या वादानंतर आता केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही', असे स्पष्ट मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.

एकीकडे 'आदिपुरूष' चित्रपटावरुन टीका होत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी चित्रपटावर (Movie) वक्तव्य केले आहे. देशात कोणालाही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही आहे. चित्रपटाच्या संवादावर आक्षेप घेण्यात येत आहे. यासाठीच आदिपुरूषचे लेखक मनोज मुंतशिर यांनी स्वत:च्या सुरक्षेची मागणी केली आहे.

BJP on Adipursh
Adipurush controversy: 'आदिपुरुष'ला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी? सवाल करत नाशिकच्या महंतांनी केली चित्रपटावर बंदीची मागणी

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर याचं म्हणणं आहे की, सेन्सॉर बोर्डाचे हे काम आहे. यासंबधी सर्व निर्णय सेन्सॉर बोर्ड घेईल. चित्रपटातील डायलॉग बदलण्याची मागणी निर्मात्यांकडे केली जात आहे. त्यावर ते म्हणाले की, कोणालाही धार्मिक भावना (Feelings) दुखावण्याचा अधिकार नाही.

याचदरम्यान अनुराग ठाकूर यांनी 23 जूनला पाटणा येथे होणाऱ्या बैठकीवरून विरोधी पक्षनेत्यांवर निशाणा साधला. त्यांचं म्हणणं आहे की, विरोधी पक्षनेते जे बिहारला जात आहेत, त्यांनी तिकडे चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत नितिश कुमारांना विचारावं. 1700 कोटींचा पूल हा एकदा नाही तर कित्येक वेळेला पत्त्यासारखा कोसळला आहे. कोट्यवधींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा झाला आहे. या भ्रष्ट पक्षांचे एकत्रीकरण व्हायला नको. त्यांना कळायला हवं की या एकत्रीकरणाचा नेता कोण आहे?

BJP on Adipursh
Sunil Lahari On Adipurush: हनुमानाच्या तोंडी अशी उद्धट भाषा? आदिपुरुषवर रामायणातील लक्ष्मणाने केली गंभीर टीका

याआधी 12 जूनला पाटणामध्ये विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार होती. राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि डीएमके प्रमुख यांचे आधीच काही कार्यक्रम (Program) ठरले असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली होती.

2024 च्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी एनडीएच्या विरुद्ध संयुक्त मोर्चा काढण्यासाठी 23 जूनला पाटणा येथे बैठक होणार आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि स्टालियन यांच्यासोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादवही उपस्थित राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com