Adipurush controversy: 'आदिपुरुष'ला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी? सवाल करत नाशिकच्या महंतांनी केली चित्रपटावर बंदीची मागणी

वादात सापडलेल्या या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी? असा सवाल महंत अनिकेत शास्त्री यांनी केला आहे.
Adipurush controversy
Adipurush controversySaam tv

Nashik News: पौराणिक कथेवर आधारित असलेल्या'आदिपुरुष ' सिनेमामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. वादग्रस्त संवादामुळे हा सिनेमा वादात सापडला आहे. हिंदू संघटनांचे कार्यकर्त्यांनी या सिनेमाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या वादग्रस्त सिनेमाच्या विरोधात महंत अनिकेत शास्त्री यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वादात सापडलेल्या या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी? असा सवाल महंत अनिकेत शास्त्री यांनी केला आहे. (Latest Marathi News)

काल काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एका मल्टीप्लेक्समध्ये शिरुन शो सुरू असताना गोंधळ घातला. या आक्रमक आंदोलकांनी सिनेमाचा शो बंद पाडला. या आंदोलकांनी मल्टीप्लेक्समध्ये या सिनेमाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हिंदू संघटनेचे कार्यकर्ते सिनेमाच्या विरोधात आक्रमक होत असताना अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रमुख महंत अनिकेत शास्त्री यांनी चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे.

Adipurush controversy
Adipurush Writer Post: ‘आदिपुरुष’मधील वादग्रस्त डायलॉगनंतर लेखकाने घेतलं एक पाऊल मागे, म्हणाले, ‘रामकथेतून पहिला धडा...’

महंत अनिकेत शास्त्री म्हणाले, 'केंद्र सरकारने 'आदिपुरूष' चित्रपटावर ताबडतोब बंदी आणावी. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी? यापुढे अशा धर्मविघातक चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने परवानगी देवू नये'. वादात सापडलेल्या या सिनेमाबद्दल केंद्र सरकार काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.

दरम्यान, धार्मिक गुरू कालीचरण महाराज यांनी देखील सिनेमाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. कालीचरण महाराज म्हणाले, 'आदिपुरुष' चित्रपट मी पाहिला नाही. मात्र, त्यातील हिंदुविरोधी घटना आणि देवचरित्राचा अवमान करणारे शब्द अत्यंत निंदनीय आहेत. हा हिंदूच्या विकृतीकरणाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंदूंनी या चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे. जे लोक त्याचं समर्थन करत आहेत, ते धर्मनिरपेक्ष आहेत. तर जे विरोध करतात ते धर्मप्रेमी आहेत.त्यांनी त्यावर बहिष्कार घातला पाहिजे'.

Adipurush controversy
Adipurush Controversy: 'आदिपुरुष'वरून वाद टोकाला, थेट बंदीची मागणी; ऋषी-मुनींनी निर्मात्यांवर केले आरोप

'आदिपुरूष' किती कमाई केली?

'आदिपुरुष चित्रपटाने २२१.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या कमाई सध्या स्थिर असल्याचे दिसून येत आहे. सिनेमा वादात अडकला असला तरी सिनेमाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com