Adipurush Controversy: 'आदिपुरुष'वरून वाद टोकाला, थेट बंदीची मागणी; ऋषी-मुनींनी निर्मात्यांवर केले आरोप

Adipurush Movie: ‘आदिपुरूष’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संवाद या दोन्हींवर टीका होत आहे.
Pushpa actor Allu Arjun and mohanlal watch Adipurush
Pushpa actor Allu Arjun and mohanlal watch Adipurush Saam Tv

Bollywood Movie: रामायणावर (Ramayan) आधारित ‘आदिपुरूष’ चित्रपट (Adipurush Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद काही थांबायचे नाव घेत नाहीये. प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (kriti sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर 'आदिपुरुष' हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संवाद या दोन्हींवर टीका होत आहे. देशभरातून या चित्रपटावर टीकेची झोड सुरुच आहे.

Pushpa actor Allu Arjun and mohanlal watch Adipurush
Adipurush Controversy : जय श्री राम! 'आदिपुरूष'चं स्क्रीनिंग सुरू असताना थिएटरमध्ये राडा, हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शो बंद पाडला

अशामध्ये आता या चित्रपटातील संवादांमुळे संतप्त झालेल्या अयोध्येतील संतांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संतांनी या चित्रपटाविरोधात आवाज उठवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या विकृतीवर देखील संतांनी आक्षेप घेतला होता.चित्रपटात रामायणातील पात्रांचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून हिंदू देवतांना विकृतपद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा या साधू संतांनी केला आहे.

रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की,'यापूर्वी आम्ही विरोध करूनही चित्रपट निर्मात्यांनी रामायणातील पात्रांचे चुकीचे चित्रण केले आहे. या चित्रपटात त्यांनी हिंदू देव-देवतांना विकृत पद्धतीने दाखवले आहे. चित्रपटातील संवाद लज्जास्पद असून चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी.'

Pushpa actor Allu Arjun and mohanlal watch Adipurush
Rashmika Mandanna Manager: रश्मिकासोबत मोठा विश्वासघात! सत्य समोर येताच अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल

सत्येंद्र दास यांनी पुढे सांगितले की, 'या चित्रपटात भगवान राम, भगवान हनुमान तसेच रावण पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत. चित्रपटात आपले देव पूर्णपणे वेगळ्या रूपात दाखवण्यात आले आहेत. जे आजपर्यंत आपण वाचले आणि माहीत नाही.' अयोध्येतील प्रसिद्ध हनुमान गढी मंदिराचे पुजारी राजू दास यांनीही चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Pushpa actor Allu Arjun and mohanlal watch Adipurush
Rakesh Master Passes Away: टॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध कोरिओग्राफरचे निधन, वयाच्या 53 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजू दास यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'बॉलिवूड हिंदू धर्माचे विकृतीकरण करण्यावर बेतले आहे.'आदिपुरुष' हा चित्रपट हिंदूंच्या भावनांची काळजी नसल्याचे उत्तम उदाहरण आहे. अयोध्येतील संतांची सर्वात शक्तिशाली संघटना मणिराम दास चावनी पीठानेही चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

आदिपुरुष चित्रपटावरुन एकीकडे वाद सुरु असला तरी दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांना आनंद झाला आहे. या चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलणार असल्याची घोषणा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com