Adipurush Writer Post: ‘आदिपुरुष’मधील वादग्रस्त डायलॉगनंतर लेखकाने घेतलं एक पाऊल मागे, म्हणाले, ‘रामकथेतून पहिला धडा...’

Adipurush Writer Manoj Muntashir On Exclude Dialogue: ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी नुकतेच चित्रपटातील वादग्रस्त संवादावर भाष्य केले आहे.
Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir
Adipurush Dialogue Writer Manoj MuntashirSaam Tv

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. काहींनी चित्रपटाचे तोंड भरून कौतुक केले, तर काहींनी चित्रपटाच्या व्हिएफएक्स, कलाकरांचे पात्र आणि अनेक वेगवेगळ्या कारणांवरून निर्मात्यांना ट्रोल केले. रामायण कथेवर आधारित असलेल्या चित्रपटाची भव्य दिव्यता सर्वच प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करत होते. मात्र चित्रपटातील संवादांनी अनेक प्रेक्षकांची निराशा केली.

रामायणातील कथा दाखवणाऱ्या चित्रपटातील अनेक संवाद प्रमाण भाषेतील होते, त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच समीक्षकांसह नेटकऱ्यांनी चित्रपटावर टीका केली आहे. आता मनोज मुंतशीर यांनी या आठवड्यात चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलून ते चित्रपटात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir
Pujappura Ravi Death: ज्येष्ठ मल्याळम अभिनेते पूजापुरा कालवश, ८०० हून अधिक सिनेमात केलं होतं काम...

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी नुकतेच चित्रपटातील संवादावर भाष्य केले आहे. संवाद लेखक मनोजस मुंतशीर यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, अशा भाषेचा वापर चुकून केला गेला नसून, तरुण प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी सर्वाधिक यावे यासाठी जाणीवपूर्वक वापरण्यात तशा पद्धतीच्या भाषेचा वापर केला आहे. भारतातील अनेक कथाकार अशाच भाषेत कथा कथन करत आहेत. पण आता लेखक मनोज मुंतशीरने ट्विटरवर चित्रपटातील संवादांबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. प्रेक्षकांच्या भावनांपेक्षा निर्मात्यांसाठी आणि लेखकांसाठी काहीही महत्त्वाचे नाही, असे ते म्हणाले.

मनोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले, “रामकथेतून पहिला धडा मिळतो तो म्हणजे प्रत्येक भावनेचा आदर करणे. ही गोष्ट बरोबर आहे की चुकीची, वेळेनुसार सर्वच बदलते, पण भावना तशीच राहते. मी ‘आदिपुरुष’ मध्ये 4000 हून अधिक ओळींचे संवाद लिहिले, 5 ओळींवर काही प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्या शेकडो ओळींमध्ये जिथे श्रीरामाची स्तुती होते, माता सीतेच्या पावित्र्याचे वर्णन होते, त्याची प्रेक्षकांनी स्तुती करायला हवी होती, पण ती स्तुती कोणीही केली नाही. अनेक नेटकऱ्यांनी माझ्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्द लिहिले...” अशा प्रकारे त्यांनी भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.सोबतच यावेळी लेखक मनोज यांनी आठवड्याभरात चित्रपटातील संवाद बदलले जातील याची ग्वाही दिली.

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir
Adipurush Breaks Record: आदिपुरुषची बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई ; बाहुबली 2, आरआरआर, केजीएफ 2 चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाची कथा पौराणिक कथेवर आधारित आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास प्रभु श्री रामांच्या, क्रिती सेनन माता जानकीच्या तर, सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या तर, सैफ अली खान रावणाची व्यक्तीरेखा साकारतोय. चित्रपटातील कलाकारांनी ही तगड मानधन घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यावधींची कमाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com