Ranbir Kapoor  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahadev Betting Case: 'महादेव बुक' अ‍ॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी रणबीर कपूर हजर राहणार नाही, अभिनेत्याने ईडीकडे मागितली २ आठवड्यांचा वेळ

Mahadev App Case: रणबीर आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Bollywood Actor Ranbir Kapoor:

'महादेव बुक' अ‍ॅप प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ईडीने नोटीस पाठवल्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. रणबीरला ईडीने नोटीस पाठवत ६ ऑक्टोबर म्हणजे आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण रणबीर आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रणबीर कपूरने ईडीकडे (ED) दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने 'महादेव बुक' या गेमिंग अ‍ॅपसाठी जाहिरात केली होती. या जाहिरातीसाठी त्याला महादेव बुक अ‍ॅपच्या प्रमोटर सौरभ चंद्राकरने रोख रक्कम दिल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसंच रणबीर जाहिरातीच्या माध्यमातून या अ‍ॅपचे प्रमोशन करत होता असा दावा देखील ईडीने केला आहे. ऐवढंच नाही तर रणबीरने सौरभ चंद्राकरच्या लग्नाला देखील हजेरी लावली होती.

ऑनलाईन गेमिंग प्रकरणात (Online Gaming Case) ईडीने (ED) रणबीरला ४ ऑक्टोबर रोजी नोटीस पाठवली होती. ईडीने अभिनेत्याला समन्स पाठवत ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण आज तो चौकशीसाठी हजर राहणार नाही. त्याने ईडीला दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. महादेव बुक अ‍ॅप प्रकरणात रणबीर कपूर पाठोपाठ बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.

ईडीने याप्रकरणी गुरूवारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि कपिल शर्मा यांना नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याचसोबत ईडीने हुमा कुरेशी आणि हिना खान या अभिनेत्रींना देखील चौकशीसाठी बोलावले आहे. आता याप्रकरणात एकाएका सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत.

दरम्यान, या बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकार याचं याचवर्षी फेब्रुवारीमध्ये दुंबईत लग्न झालं होतं. या लग्नासाठी सौरभने जवळपास २०० कोटींची उधळपट्टी केली होती. सौरभच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इतकंच नाही, तर सौरभच्या लग्नात परफॉर्मस करण्यासाठी सेलिब्रटींनी कथितपणे पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे सेलिब्रिटी अडचणीत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT