Leo Trailer: विजय थलपती अन् संजूबाबाची अफलातून केमिस्ट्री; अवघ्या काही वेळातच पार केला कोट्यवधींचा टप्पा...

Leo Trailer Shared On Social Media: टॉलिवूड अभिनेता विजय थलपतीच्या बहुचर्चित ‘लिओ’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
Leo Trailer
Leo TrailerYouTube
Published On

Thalapathy Vijay Films Leo Trailer Out

टॉलिवूड अभिनेता विजय थलपतीच्या बहुचर्चित ‘लिओ’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. धमाकेदार ॲक्शन आणि अफलातून ड्रामा असलेल्या चित्रपटात बॉलिवूडसह टॉलिवूडमधल्या दिग्गज सेलिब्रिटींची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच, अवघ्या काही क्षणातच चित्रपटाच्या ट्रेलरची प्रचंड चर्चा सुरु झाली.

Leo Trailer
Betting App case: अभिनेत्री श्रद्धा कपूरला ईडीकडून समन्स, कपिल शर्माचीही चौकशी होणार; काय आहे प्रकरण?

चित्रपटामध्ये थलपती विजय, त्रिशा कृष्णन आणि संजय दत्त हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर विजय थलपतीच्या डॅशिंग लूकची चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. चित्रपटाची कथा लिओभोवती फिरताना दिसत आहे.

चित्रपटाची कथा भुतकाळाभोवती फिरत आहे. चित्रपटामध्ये अनेक पात्रांचा भुतकाळ आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय थलपतीचा हा चित्रपट लोकेश कनगराजच्या ‘कार्थी’ आणि ‘विक्रम’ प्रमाणेच आहे. हे चित्रपट एकाच युनिव्हर्समधील आहे.

खरंतर या चित्रपटामध्ये दमदार व्हीएफएक्सचा वापर करत ट्रेलर प्रदर्शित केला आहे. प्राण्यांसोबतच्या काही सीन्समध्ये व्हीएफएक्सचा वापर करुन जसेच्या तसे सीन्स सादर केले. हा चित्रपट लोकेस सिनेमॅटीक युनिव्हर्समधील आहे, प्रदर्शनाआधीच चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.

तमिळ, तेलुगू आणि कन्नडप्रमाणे हिंदीतही विजयचा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडीत काढेल यात शंका नाही. ‘लिओ’ १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करत असून चित्रपटाची निर्मिती ललित कुमार यांनी केलेय.

Leo Trailer
Mahadev Betting App Case: मोठी बातमी! कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खानला ईडीने बजावलं समन्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com