Chandramukhi 2  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chandramukhi 2 Online Leak: कंगना रनौतला मोठा झटका, HD मध्ये लीक झाला 'चंद्रमुखी 2'

Priya More

Chandramukhi 2 Movie:

बॉलिवूडची (Bollywood) 'कॉन्ट्रव्हर्सी क्वीन' कंगना रनौत आपल्या आगामी 'चंद्रमुखी २' (Chandramukhi 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगना तब्बल दीड वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतली आहे. कंगना राणौतचा 'चंद्रमुखी २' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. २८ सप्टेंबरला रिलीज झालेला कंगना रनौतचा (kangana ranaut) 'चंद्रमुखी २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'फुकरे 3' आणि 'वॅक्सीन वॉर' या दोन चित्रपटांना टक्कर देत आहे. याच दरम्यान कंगना रनौतच्या चित्रपटाला आणखी एक धक्का बसला आहे. रिलीज होताच 'चंद्रमुखी २' चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे.

कंगना रनौत आणि राघव लॉरेन्स यांचा 'चंद्रमुखी २' नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 'चंद्रमुखी २' चित्रपट प्रदर्शित होताच कंगना रनौतसाठी वाईट बातमी आली आहे. कारण रिलीज होताच तिचा चित्रपट ऑनलाइन लीक झालाय. कंगना रनौतचा चित्रपट 'चंद्रमुखी २' एका पायरेटेड वेबसाईटने लीक केला आहे.

चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे त्याचा चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये फरक पडणार आहे. रिलीज होताच एखादा चित्रपट लीक होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक मोठे चित्रपट ऑनलाइन लीक झाले आहेत. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो पायरेटेड वेबसाईटवर येतो ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण अशापद्धतीने चित्रपट लीक झाल्यामुळे त्याचा मोठा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर होतो.

कंगना रनौतचा चित्रपट 'चंद्रमुखी २' हा साऊथ स्टार रजनीकांतच्या २००५ मध्ये रिलीज झालेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटाचा सिक्वेल आहे. पी वासू दिग्दर्शित 'चंद्रमुखी 2' या चित्रपटाबद्दल कंगनाचे चाहते खूपच उत्सुक होते. चित्रपट रिलीज होताच चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कंगना मे 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'धाकड' चित्रपटात दिसली होती. कंगना रनौतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता तब्बल दीड वर्षानंतर तिचा चित्रपट पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT