Bobby Deol Song Jamal Kudu  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jamal Kudu Song: 'अ‍ॅनिमल'मध्ये बॉबी देओलच्या एन्ट्रीवेळी वाजलेलं 'जमाल कुडू' गाणं रिलीज, ऐकून तुम्हीही नाचू लागाल

Bobby Deol Jamal Kudu Song Out: या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या जबरदस्त एन्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटातील बॉबी देओलने अबरारची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये बॉबी देओलची एन्ट्री होते तेव्हा 'जमाल कुडू' हे गाणे वाजते.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलचा (Bobey Deol) चित्रपट 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणबीर कपूरच्या करिअरमध्ये 'अ‍ॅनिमल' हा आतापर्यंतचा सर्वात जास्त ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटाला आला. ५ दिवसांमध्ये या चित्रपटाने ४५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सहाव्या दिवशी देखील या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला. महत्वाचे म्हणजे या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या जबरदस्त एन्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटातील बॉबी देओलने अबरारची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये बॉबी देओलची एन्ट्री होते तेव्हा 'जमाल कुडू' हे गाणे वाजते. हे पारंपारिक इराणी गाणे आहे. अॅनिमल हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉबी देओलच्या चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दल एक वेगळीच उत्सुकता होती. लोकांना जाणून घ्यायचे होते की हे संपूर्ण गाणे कसे आहे? पण हे संपूर्ण गाणे चित्रपटासोबत रिलीज झाले नाही.

बॉबी देओलचे चाहते आणि नेटिझन्स चित्रपटामध्ये वाजलेल्या 'जमाल कुडू' या गाण्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारत होते. अखेर बॉबी देओलने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. अखेर आज हे संपूर्ण गाणं रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं असून अल्पवाधितच त्याचा चांगली पसंती मिळाली आहे. 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी बुधवारी 'जमाल कुडू' गाण्याचा ऑडिओ रिलीज केला. हे गाणं ऐकून अनेकांना नाचण्याचा मोह आवरता येत नाहीये. सध्या या गाण्याचा ऑडिओ सर्व सोशल मीडिया साइटवर व्हायरल होत आहे. बॉबी देओलचे चाहते त्या गाण्यावर रील बनवून पोस्ट करत आहेत.

बॉबी देओलने देखील त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर 'जमाल कुडू' गाण्याच्या ऑडिओसह एक मोशन पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये तो डोक्यावर ग्लास घेऊन उभा राहिलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या गाण्यावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणालात आणि आम्ही ऐकलं, आज हे गाणं सर्वांसाठी रिलीज करण्यात आलं. 'जमाल कुडू' हे हिंदी नसून इराणी गाणं आहे. हे गाणं हर्षवर्धन यांनी संगीतबद्ध केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT