'अॅनिमल' चित्रपटाच्या (Animal Movie) दमदार यशानंतर बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) पुन्हा एकदा अॅक्शन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अॅनिलमलमध्ये अनिल कपूरने रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) वडिलांची दमदार भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू आहे. हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे.
अशामध्येच आता अनिल कपूर एका नव्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिक रोशन, दीपिका पदुकोणनंतर आता 'फायटर' (Fighter Movie) चित्रपटातील अनिल कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मेगास्टार आणि 'बॉलिवुडचा बाप' अनिल कपूर लवकरच सिद्धार्थ आनंदच्या 'फायटर'मध्ये आणखी एका वेगळ्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर कॅप्टन राकेश जयसिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या चित्रपटातील माझा कॉल साइन 'रॉकी' आहे.' 'फायटर' चित्रपटातील अनिल कपूरचा लूक खूपच अप्रतिम आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर कमांडिंग ऑफिसर कॅप्टन राकेश जयसिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अनिल कपूर सध्या जोरदार चर्चेत असून 'जुग जुग जीयो', 'द नाईट मॅनेजर' आणि 'अॅनिमल'नंतर आता तो 'फायटर'मधून भेटायला येत आहे. फायटरमधील रॉकीच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी तो तयार होत आहे. याआधी 'फायटर' चित्रपटातील दीपिका पदुकोणचा लूक समोर आला होता. यामध्ये अभिनेत्री एअर ड्रॅगन युनिटमध्ये स्क्वाड्रन पायलटच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाचा कॉल साइन मिन्नी आहे. दीपिकापूर्वी हृतिक रोशनचा लूक समोर आला होता जो खूपच अप्रतिम होता. या चित्रपटात हृतिक अभिनेता स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये हृतिकचा कॉल साइन पॅटी आहे.
दरम्यान, हृतिक आणि दीपिकाचा 'फायटर' हा इतर चित्रपटापेक्षा वेगळा आहे. या चित्रपटाची कथा वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला असून वायकॉम 18 स्टुडिओने मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन आणि देशभक्तीची भावना पाहायला मिळणार आहे. 'फायटर' चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.