Animal Worldwide Collection: 'अ‍ॅनिमल'ची वर्ल्डवाइड कलेक्शनमध्येही बाजी, 'पठाण' आणि 'गदर 2'चे मोडले रेकॉर्ड

Animal Box Office Collection Day 5: सोमवारी या चित्रपटानेही 'जवान' (Jawan Movie) आणि 'गदर 2'चे (Gadar 2) रेकॉर्ड मोडले. सहाव्या दिवशी देखील या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायाल मिळत आहे.
Animal Movie
Animal MovieSaam Tv

Ranbir Kapoor Animal Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलचा (Bobby Deol) चित्रपट 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असून जबरदस्त कमाई करत आहे. रणबीर कपूरचा हा चित्रपट वर्किंग डेजमध्ये देखील चांगली कमाई करताना दिसत आहे.

सोमवारी या चित्रपटानेही 'जवान' (Jawan Movie) आणि 'गदर 2'चे (Gadar 2) रेकॉर्ड मोडले. सहाव्या दिवशी देखील या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायाल मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहेत. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाने वर्ल्डवाइडमध्ये देखील जबरदस्त कमाई केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंगळवारी या चित्रपटाने केलेल्या कमाईचे आकडे आश्चर्यकारक आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशी तुफान कमाई करत इतिहास रचला आहे. या चित्रपटाने जगभरात देखील झपाट्याने कमाई केली आहे. 500 कोटींचा पल्ला गाठायला हा चित्रपट अवघे काही अंतर दूर आहे. 'अ‍ॅनिमल'ने वर्ल्डवाइड 481 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

'अ‍ॅनिमल'च्या आतापर्यंतच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर , पाचव्या दिवशी म्हणजे पहिल्या मंगळवारी अ‍ॅनिमलने भारतात 38.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचे भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शन 283.74 कोटींवर पोहचले आहे. अशापद्धतीने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत हा चित्रपट इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. अ‍ॅनिमलने यावर्षीच्या टॉप बॉलिवूड चित्रपट 'पठाण' आणि 'गदर 2'चे रेकॉर्ड सहज मोडले आहेत. या विकेंडपर्यंत हा चित्रपट किती कमाई करतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Animal Movie
Sonu Sood: 'मी पप्पांना नाही वाचवू शकत...', संकटात असलेल्या चाहत्यांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद

'अ‍ॅनिमल'च्या चार दिवसांच्या कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, पहिल्या दिवशी अॅनिमलने 63.8 कोटी रुपयांची दमदार कमाई केली होती. त्यापैकी हिंदीमध्ये 54.75 कोटी रुपये, तेलुगूमध्ये 8.55 कोटी रुपये, तामिळमध्ये 4 लाख रुपये, कन्नडमध्ये 9 लाख रुपये आणि मल्याळममध्ये 1 लाख रुपये कमावले होते. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 66.27 कोटी रुपयांची कमाई केली होती. रणबीर कपूरच्या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी आणि चौथ्या दिवशी 43.96 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Animal Movie
Priyanka Chopra Deepfake Video: जान्हवी कपूरनंतर बॉलिवूडची 'देसी गर्ल' डीपफेकची शिकार, VIDEO होतोय व्हायरल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com