Sonu Sood: 'मी पप्पांना नाही वाचवू शकत...', संकटात असलेल्या चाहत्यांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद

Sonu Sood Post Viral: दिल्लीतील एम्सच्या (Delhi AIIMS) रांगेत उभ्या असलेल्या पल्लव सिंगने आपल्या वडीलांना मदत मिळावी यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती
Sonu Sood Help Fan
Sonu Sood Help Fan Saam Tv

Sonnu Sood help Fan:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर आपल्या अभिनयामुळे नाही तर सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. सोनू सूद आतापर्यंत अनेकदा आपल्या चाहत्यांना ‘एक हात मदतीचा’ देत त्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्याने कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करत देवदूत झाला होता.

सोनू सूदचे हे मदत कार्य आजही तसेच सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा सोनू सुद आपल्या चाहत्याच्या मदतीला धावून आला आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्या लाईनमध्ये उभ्या राहिलेल्या चाहत्याने मदतीसाठी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट वाचून सोनू सूद त्याच्या मदतीसाठी धावून आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीतील एम्सच्या (Delhi AIIMS) रांगेत उभ्या असलेल्या पल्लव सिंगने आपल्या वडीलांना मदत मिळावी यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्याच्या वडीलांना सप्टेंबर महिन्यामध्ये हार्ट ॲटॅक आला होता. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी त्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात मागितला आहे.

अभिनेता सोनू सूदने पल्लव सिंगच्या पोस्टला रिप्लाय देत मदतीचे आश्वासन दिले आहे. त्याने लिहिले की, 'तुझ्या वडीलांना मी मरू देणार नाही. तू धीर धर, तुझा नंबर मला डीएम कर...' . त्याच्या या पोस्टवर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे राहणारा पल्लव सिंग या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ' माझ्या वडिलांचे हृदय फक्त २० टक्के काम करत आहे. माझ्या वडिलांचा लवकरच मृत्यू होईल. मल माहिती आहे की मी काय करत आहे. मी दिल्लीतल्या एम्सच्या लाइनमध्ये उभं राहून ही पोस्ट लिहित आहे. मी भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. ज्यामध्ये भारतीय लोकसंख्येचा बहुतांश भाग येतो आणि मला नाही वाटत की मी माझ्या पप्पांना वाचवू शकतो.'

Sonu Sood Help Fan
Priyanka Chopra Deepfake Video: जान्हवी कपूरनंतर बॉलिवूडची 'देसी गर्ल' डीपफेकची शिकार, VIDEO होतोय व्हायरल

वडिलांच्या गंभीर शस्त्रक्रियांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करत असताना पल्लवने खासगी आरोग्य सेवा परवडत नसल्यामुळे कुटुंबावर होणाऱ्या भावनिक आणि आर्थिक परिणामांचे पोस्टमध्ये तपशीलवार वर्णन केले. पल्लवच्या पोस्टला उत्तर देताना एम्स दिल्लीने लिहिले की, 'एम्स नवी दिल्लीला कळले आहे की कार्डिओलॉजी ओपीडीमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णाला प्रतीक्षा कालावधी दरम्यान काही समस्या होत्या. आम्ही रुग्ण आणि मुलाला बोलावले. आम्हाला कळले की रुग्ण आता देवरिया, यूपीमधील त्याच्या गावात आहे आणि घरी व्यवस्थित आहे.'

Sonu Sood Help Fan
Mahaparinirvaan First Look: महामानवाच्या दिव्य आणि तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली...,'महापरिनिर्वाण'चा फर्स्ट लूक आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com