Sonu Sood: हेल्मेट तर घालावाच लागेल! सोनू सूद आणि मुंबई पोलिसांनी दुचाकीस्वारांना दिले फ्री हेल्मेट

Sonu Sood Distributed Helmets: विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या तरुणांना मोफत हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र हायवे ट्राफिक पोलिसांकडून हाती घेण्यात आला.
Sonu Sood
Sonu SoodSaam Tv
Published On

Sonu Sood:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) फक्त आपल्या चित्रपटांमुळेच नाही तर सामाजिक कार्यामुळे देखील चर्चेत असतो. कोरोना काळामध्ये सोनू सूदने रस्त्यावर उतरून सर्वांना मदत केली. आजही सोनू सूद शक्य होईल तितकी मदत करत असतो. कोरोना काळात (Corona) सोनू सूदला अनेकांनी देव मानले. आता सोनू सूद पुन्हा त्याच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत आला आहे.

Sonu Sood
Ram Charan And Dhoni Meets: मुंबईत येताच रामचरणने घेतली महेंद्र सिंग धोनीची भेट, ‘धोनीला भेटून खूप आनंद झाला...’ म्हणत केला आनंद व्यक्त

सोनू सूदने आज पुन्हा रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली आहे. महाराष्ट्र हायवे ट्राफिक पोलीस प्रशासनाच्या वतीने आज मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोड परिसरात एक आगळा वेगळा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मुंबईत दुचाकीवरून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे पाहता विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या तरुणांना मोफत हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र हायवे ट्राफिक पोलिसांकडून हाती घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे सोनू सूदच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र हायवे ट्राफिक एडीजी रवींद्र शिंकला आणि अभिनेता सोनू सूद यांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावून विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या तरुणांना मोफत हेल्मेट वाटप करून जनजागृती केली. 'रस्त्यावर कांड न करता कर्म करा' असा संदेश यावेळी अभिनेता सोनू सूद आणि महाराष्ट्र हायवे ट्राफिक एडीजी रवींद्र शिंकला यांनी दुचाकीस्वारांना दिला.

Sonu Sood
AR Rahman Defamation Case: '१५ दिवसांत १० कोटी द्या नाहीतर...', ए आर रहमान यांनी ठोकला मानहानीचा दावा

पोलिसांना मदत करत सोनू सूदने दुचाकीस्वारांना नवीन हेल्मेटचे वाटपही केले. अभिनेत्याने लोकांना स्वतःच्या हातांनी हेल्मेट घालताना वाहतुकीचे नियम पाळण्याची विनंती केली. सोनूने सांगितले की, 'लोकांनी आपल्या कुटुंबाची आणि देशाच्या कायद्याची काळजी करताना वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे आणि हेल्मेट घालूनच दुचाकी चालवावी.' नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Sonu Sood
Veena Played Pappani Ganpati Aanla: वीणा वाजवत गायलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला...’ गाणं; मंत्रमुग्ध करणारे सूर एकदा ऐकाच...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com