AR Rahman Defamation Case: '१५ दिवसांत १० कोटी द्या नाहीतर...', ए आर रहमान यांनी ठोकला मानहानीचा दावा

AR Rahman Files Case: बॉलिवूडचे दिग्गज संगीत दिग्दर्शक ए आर रेहमान यांनी एका संस्थेला मानहानीची नोटीस पाठवली आहे.
A R Rahman Net Worth
A R Rahman Net WorthSaam Tv
Published On

AR Rahman Legal Notice:

बॉलिवूडचे दिग्गज संगीत दिग्दर्शक ए आर रेहमान यांनी एका संस्थेला मानहानीची नोटीस पाठवली आहे. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियावर ए आर रहमान यांनी १० कोटी रूपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. ए आर रहमान यांनी ही मागणी एका कायदेशीर नोटीसला उत्तर देताना केली आहे.

ASICON या संस्थेने ए आर रहमान यांच्यावर असा आरोप केला आहे की, २०१८ मध्ये संस्थेच्या ७८ व्या वार्षिक संम्मेलनात ए आर रहमान परफॉर्म करणार होते. या कार्यक्रमासाठी ए आर रेहमान यांना अॅडवान्समध्ये पैसे देण्यात आले होते. परंतु ते कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यामुळे ASICON यांनी कथिकपणे ए आर रहमान यांच्याकडे अॅडवान्स बुकिंगसाठी दिलेले पैसे परत दिले नसल्याचा आरोप करत २९.५ लाख रूपयांची मागणी केली.

A R Rahman Net Worth
Ankit Tiwari Concert: आधी खेचल्या झिंज्या, नंतर एकमेकांवर पाडला चापटांचा पाऊस; गायक अंकित तिवारीच्या कॉन्सर्टमध्ये तरुणींची मारामारी

४ पानांच्या उत्तरात ए आर रहमान यांच्या वकील नर्मदा संपत यांनी ASICON या संस्थेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ए आर रहमानच्या वकिलाने उत्तर देताना सांगितले की, त्यांनी कधीच या संस्थेसोबत करार केला नव्हता. परंतु ही संस्था प्रसिध्दीसाठी माझ्या नावाचा वापर करत असून माझे नाव बदनाम करत आहे. या कार्यक्रमाच्या अॅडवान्स बुकिंगसाठी मला पैसेच देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ए आर रहमान यांनी उत्तरात पुढे असे म्हटले आहे की, 'मला असे पैसे कधीच दिले गेले नाहीत. उलट हे पैसे 'सेंथिलवेलन अँड सेंथिलवेलन' या थर्ड पार्टी कंपन्यांच्या समूहाला देण्यात आले होते. ASICON या संस्थेचा माझ्याशी कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही आणि हे माहीत असूनही त्यांनी मला वादात अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फक्त संस्थेच्या प्रसिद्धीसाठी आणि मला त्रास देण्यासाठी करण्यात आले आहेत. (Celebrity)

ए आर रहमान आणि त्यांच्या वकील नर्मदा संपत यांनी सर्जन्स असोसिएशनला जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे. तसेच १५ दिवसांत १० कोटी रूपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. (Latest Entertainment News)

A R Rahman Net Worth
Sur Nava Dhyas Nava: तिने गायक म्हणून मला पुनर्जन्म दिला...; अभिनेता समीर परांजपेची 'सुर नवा ध्यास नवा'मधून नवी सुरुवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com