Actor Sameer Paranjape Participated in Sur Nava Dhyas Nava
Actor Sameer Paranjape Participated in Sur Nava Dhyas NavaSaam Tv

Sur Nava Dhyas Nava: तिने गायक म्हणून मला पुनर्जन्म दिला...; अभिनेता समीर परांजपेची 'सुर नवा ध्यास नवा'मधून नवी सुरुवात

Sameer Paranjape In Sur Nava Dhyas Nava : समीर लवकरच 'सुर नवा ध्यास नवा' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.
Published on

Sameer Paranjape In Sur Nava Dhyas Nava

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम समीर परांजपे हा उत्तम कलाकार आहे. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. समीर त्याच्या उत्तम अभिनयामुळे तर नेहमीच चर्चेत असतो. परंतु आता तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. समीर लवकरच 'सुर नवा ध्यास नवा' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.

समीर परांजपे हा अभिनेता म्हणून सर्वांनाच माहित आहे. परंतु गायक म्हणून तो पहिल्यांदाच सर्वांसमोर येणार आहे. समीर नेहमीच सोशल मीडियावरुन गाण्याचे व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या गाण्याची कला प्रेक्षकांना माहितच आहे.

Actor Sameer Paranjape Participated in Sur Nava Dhyas Nava
Javed Akhtar Controversy: जावेद अख्तर आणि कंगना रनौतची न्यायलयीन लढाई, अभिनेत्रीने कोर्टात नोंदवला जबाब

समीरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो 'सुर नवा ध्यास नवा'च्या मंचावर गाणं गाताना दिसत आहे. समीरने या कार्यक्रमाक अभिनेता नव्हे तर स्पर्धक म्हणून शोमध्ये सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे समीर या शोमध्ये त्याच्या लेकीसाठी आला आहे.

व्हिडिओत समीरने शोमध्ये येण्यामागचे कारण सांगितले आहे. 'जिच्यामुळे मी इथे आलोय ती म्हणजे माझी मुलगी साची, मी तिला जन्म दिला पण गायक म्हणून तिने मला जन्म पूनर्जन्म दिलाय'.असं समीर म्हणला. 'येतोय पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला.. पण या वेळी अभिनेता म्हणून नाही..गायक म्हणून' असं कॅप्शन समीरने या व्हिडिओला दिले आहे.

समीरच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 'सूर नवा ध्यास नवा'चे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ७ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.

Actor Sameer Paranjape Participated in Sur Nava Dhyas Nava
Explainer: 'महादेव'च्या नावाने सट्टेबाजी, दुबईत लग्नाला उडवले २०० कोटी; कोण आहे सौरभ चंद्राकर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com