Priyanka Chopra Deepfake Video: जान्हवी कपूरनंतर बॉलिवूडची 'देसी गर्ल' डीपफेकची शिकार, VIDEO होतोय व्हायरल

Priyanka Chopra Deepfake: बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका च्रोपा देखील डीपफेकची शिकार झाली आहे.
Priyanka Chopra Deepfake Video
Priyanka Chopra Deepfake VideoSaam Tv

Priyanka Chopra Video:

एकापाठोपाठ एका बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी डीपफेकचा (Deepfake Video) शिकार होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. आतापर्यंत रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), आलिया भट्ट (Alia Bhatt), कतरिना कैफ (Katrina Kaif), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.

अशामध्ये आता बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका च्रोपा (Priyanka Chopra) देखील डीपफेकची शिकार झाली आहे. प्रियांका चोप्राचा डीपफेक व्हिडीओ (Priyanka Chopra Deepfake Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रियांका चोप्राचा डीपफेक व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकाचा चेहरा नाही तर तिचा आवाज बदलण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा अशा काही गोष्टी सांगत आहे की जे ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा एका ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे.

Priyanka Chopra Deepfake Video
Priyanka Chopra Deepfake VideoInstagram

व्हायरल होणाऱ्या या मॉर्फ केलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्याशी छेडछाड करण्यात आली नसून तिचा आवाज आणि शब्द एआयच्या मदतीने बदलण्यात आले आहेत. रिअल इंटरव्ह्यूमध्ये प्रियांकाचा आवाज आणि तिने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तो कंटेट बदलण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका एका बनावट ब्रँडचे समर्थन केल्याचे बोलत आहे. यासोबत ती या व्हिडीओमध्ये तिच्या वार्षिक कमाईबद्दल बोलत एका ब्रँडची पब्लिसिटी करताना दिसत आहे.

Priyanka Chopra Deepfake Video
Aamir Khan Stuck In Chennai Cyclone Michaung: ‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या पुरात आमिरसोबत अडकला टॉलिवूड अभिनेता, बचावपथकाने असा वाचवला दोघांचा जीव

या डीपफेक व्हिडिओमध्ये ती म्हणते की, 'माझे नाव प्रियांका चोप्रा आहे. मी एक अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. मी 2023 मध्ये 1000 लाख रुपये कमावले आहेत. चित्रपट आणि गाण्यांव्यतिरिक्त मी अनेक प्रोजेक्ट्समध्येही गुंतवणूक केली आहे. मी माझी मैत्रीण रुची भल्ला हिला हा प्रोजेक्ट सुचवू इच्छिते. तुम्ही दर आठवड्याला 3 लाख रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला त्याचे टेलिग्रॅम चॅनल फॉलो आणि सबस्क्राइब करण्याची गरज नाही.'

याशिवाय ती व्हिडिओमध्ये बरेच काही सांगताना दिसत आहे. पण जेव्हा तुम्ही प्रियांका चोप्राचा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहाल तेव्हा तुम्हाला दिसेल की तिचा लिपसिंक आणि आवाज पूर्णपणे वेगळा आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

Priyanka Chopra Deepfake Video
Sophie Anderson Passed Away: प्रसिद्ध पॉर्नस्टारने घेतला जगाचा निरोप, काही दिवसांपूर्वी पतीचं झालं होतं निधन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com