Yodha New Poster Out Saam tv
मनोरंजन बातम्या

Yodha New Poster Out: 'योद्धा'चा फर्स्ट लूक आऊट, निर्मात्यांनी जाहीर केली नवीन रिलीज डेट

Yodha Movie Release Date: निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करत चित्रपटाची नवीन रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

Priya More

Siddharth Malhotra:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) सध्या ​​त्याचा आगामी चित्रपट 'योद्धा'मुळे (Yodha Movie) चर्चेत आहे. या चित्रपटासंदर्भातील अपडेट्स सतत समोर येत आहेत. सिद्धार्थने या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. नुकताच निर्मात्यांनी योद्धा चित्रपटाचे नवीन पोस्टर (Yodha New Poster Out) रिलीज केले आहे. या पोस्टरमधील सिद्धार्थचा पहिला लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करत चित्रपटाची नवीन रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. याआधीही 'योद्धा' चित्रपटाची रिलीज डेट अनेकदा बदलली आहे. आता सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. योद्धा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी या चित्रपटाचे दोन आकर्षक नवीन पोस्टर शेअर केले. या दृश्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​अ‍ॅक्शन स्टाईलमध्ये दिसत आहे.

योद्धाच्या नव्या पोस्टरमध्ये सिद्धार्थ फ्लाइंग प्लेनच्या पार्श्वभूमीत कमांडोच्या ड्रेसिंगमध्ये दिसत आहे. ज्याची टॅगलाइन आहे, 'एक कमांडो. एक अपहरणकर्ता. अगणित रहस्ये.' दुसऱ्या पोस्टरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा जखमी अवस्थेत विमानाच्या मधोमध उभा असल्याचे दिसत आहे. या मनोरंजक पोस्टरसह निर्मात्यांनी चित्रपट पुढे ढकलण्याची घोषणा देखील करण्यात आली. आता हा चित्रपट १५ मार्च २०१४ रोजी रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

योद्धाचे नवीन पोस्टर सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्याने हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये 'अ‍ॅक्शन आणि थ्रिलने भरलेल्या टचडाउनसाठी तयार व्हा! तुमचे सीट बेल्ट बांधा.' त्याचसोबत त्याने या पोस्टमध्ये #योद्धा १५ मार्च २०२४ रोजी उतरेल असे लिहित चित्रपटाच्या नवीन रिलीज डेटची घोषणा केली आहे.

योद्धा चित्रपट ८ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज होणार होता. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कतरिना कैफच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाशी टक्कर होणार होती. दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र, आता सिद्धार्थ मल्होत्राच्या चित्रपटाची रिलीज डेट बदलल्याने हा संघर्ष टळला आहे. निर्मात्यांनी नवीन रिलीज डेट देऊन चित्रपटाला सर्व प्रकारच्या संघर्षांपासून वाचवले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​व्यतिरिक्त 'योद्धा' चित्रपटात दिशा पाटनी आणि राशि खन्ना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटाची कथा विमान हायजॅकवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT