Jawan Theatre Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Jawan Theatre Video: शाहरूखची जबरा क्रेझ, जवानमधील 'जिंदा बंदा' गाण्यावर फॅन्सचा नुसता राडा, VIDEO

Shah Rukh Khan Jawan Movie: जवानमधील शाहरुखच्या 'जिंदा बंदा' गाण्यावर तर चाहत्यांनी स्क्रिनच्या समोर उभं राहून जबरदस्त डान्स केला.

Priya More

Jawan Movie Released:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Actor Shah Rukh Khan) मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपट (Jawan Movie) आज प्रदर्शित झाला. शाहरुखच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस हा खूपच खास आहे. मध्यरात्रीपासूनच देशभरातील थिएटरबाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आज सकाळपासूनही चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

जवान चित्रपटाचा फर्स्ट शो पाहणाऱ्या चाहत्यांनी तर थिएटरमध्ये राडाच केला. जवानमधील शाहरुखच्या 'जिंदा बंदा' गाण्यावर तर चाहत्यांनी स्क्रिनच्या समोर उभं राहून जबरदस्त डान्स केला. सोशल मीडियावर सध्या हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर जवानचीच हवा पाहायला मिळत आहे.

जवान चित्रपटाचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहतानाच चाहत्यांना आनंद गगनामध्ये मावेनासा झाला होता. चित्रपट पाहताना चाहत्यांनी एकच जल्लोष करत या चित्रपटाचा आनंद घेतला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शाहरुखच्या चित्रपटातील 'झिंदा बंदा' हे गाणं ज्यावेळी लागले. त्यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी संपूर्ण थिएटरच हादरवून सोडले. आपल्या सीट सोडून सर्व प्रेक्षक थिएटरमधील स्क्रीनजवळ जाऊन डान्स करू लागले. शाहरुखच्या जवानची प्रेक्षकांमध्ये किती क्रेझ आहे याची प्रचिती या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे.

शाहरुख खानचे जबरा फॅन तर फक्त थिएटरमध्येच नाही तर थिएटरबाहेर देखील एकच जल्लोष करत आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट शोला चाहत्यांकडून मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादामुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुपरहिट ठरेल आणि भरघोस कमाई करेल असे दिसून येत आहे. ठिकठिकाणी शाहरुखचे चाहते जवान रिलीज झाल्याचे सेलिब्रेशन करत आहेत. काही ठिकाणी तर थिएटरबाहेर शाहरुखचे मोठे कटआऊट लावून ढोल ताशांचा गजरामध्ये चित्रपटाचे स्वागत करण्यात आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तर चित्रपट रिलीज झाल्यासंदर्भातील अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT