Ramayana Shooting Started Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoorच्या 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, सेटवरून समोर आला पहिला फोटो

Ramayana Shooting Started: या चित्रपटाबाबत एक-एक अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. या चित्रपटाबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून सेटवरून पहिला फोटो समोर आला आहे.

Priya More

First Photo From Ramayana Set:

प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitish Tiwari) यांच्या आगामी 'रामायण' (Ramayana Film) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत साई पल्लवी आणि सनी देओल हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाबाबत एक-एक अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. या चित्रपटाबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून सेटवरून पहिला फोटो समोर आला आहे.

'ॲनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रणबीरच्या करिअरमधील बिग बजेट चित्रपट असणार आहे. या चित्रपटात कथेपासून ते अप्रतिम व्हीएफएक्सपर्यंत बरेच काम केले जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत कलाकारांसोबत प्रेक्षकही खूपच उत्सुक आहे. नितेश तिवारीच्या 'रामायण'ची घोषणा झाल्यापासून रणबीर कपूर श्री रामाच्या भूमिकेत कसा दिसणार याची त्याच्या चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.

अशातच अभिनेत्री आकृती सिंहने रामायण चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. आकृती सिंहने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रामायण दिवस 1.' या चित्रपटाचा भव्य सेट फोटोमध्ये दिसत आहे. त्याचसोबत एक व्यक्ती चालताना दिसत आहे पण त्याचा चेहरा दिसत नाही. अशा परिस्थितीत हा फोटो रणबीर कपूरचा आहे की अन्य कोणाचा हे सांगणे कठीण आहे.

नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्याचसोबत लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये रवी दुबे, कैकयीच्या भूमिकेमध्ये लारा दत्ता, श्रुपनखाच्या भूमिकेमध्ये रकुल प्रीत सिंग दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभू रामाचे भाऊ भरतच्या भूमिकेमध्ये कोण दिसणार यावर चर्चा सुरू होती. अशामध्ये आता भरत हे पात्र मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VS Airtel: ₹२९९ प्रीपेड प्लॅनमध्ये जास्त डेटा कोण देईल, जिओ की एअरटेल?

8 November 2025 Horoscope: आज द्विग्रह योग होणार, मेष आणि मिथुन राशींसाठी असेल शुभ काळ

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

SCROLL FOR NEXT