Dharmendra Dance Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmendra: नातीच्या लग्नात 88 वर्षांच्या धर्मेंद्रपाजींचा तरुणांना लाजवेल असा डान्स, VIDEO पाहून चाहते थक्क

Dharmedra: नातीच्या लग्नातील धर्मेंद्र यांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी नातीच्या लग्नामध्ये डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ऐवढ्या वयात देखील धर्मेंद्र यांचा जोश पाहून चाहते देखील चकीत झाले आहेत.

Priya More

Dharmendra Dance Viral Video:

देओल कुटुंबीय सध्या चर्चेत आहेत. एकीकडे धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुलगी ईशा देओलने (Esha Deol) नुकताच पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला. तर दुसरीकडे त्यांची नात निकिता चौधरीचे लग्न पार पडले. धुमधडाक्यामध्ये पार पडलेल्या निकिताच्या लग्नसोहळ्यामध्ये संपूर्ण देओल कुटुंबीयांनी खूप धम्माल केली. नातीच्या लग्नाला धर्मेद्र यांनी हजेरी लावली. नातीच्या लग्नातील धर्मेंद्र यांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी नातीच्या लग्नामध्ये डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ऐवढ्या वयात देखील धर्मेंद्र यांचा जोश पाहून चाहते देखील चकीत झाले आहेत.

धर्मेंद्रने यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, धर्मेद्र हे सोफ्यावर बसले आहेत. त्यांनी ग्रे कलरचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. त्याचसोबत त्यांनी डोक्यावर ब्लॅक कलरची हॅट घातली आहे. हातामध्ये ज्यूसचे ग्लॅस घेऊन बसलेले धर्मेंद्र गाणं ऐकून अचानक थिरकू लागतात. उभं राहून ते डान्स करतात. मग अचानक कोणीतरी त्यांना बसायला सांगितले आणि ते खाली बसून नाचू लागतात.

त्यांचा हा डान्स व्हिडीओ सर्वांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा डान्स व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'माझ्या आवडत्या नातीच्या आनंदाच्या निमित्ताने.' त्यांच्या या डान्स व्हिडीओला ५१ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर चाहते कमेंट्स करत त्यांचे कौतुक करत आहेत.

धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करताच कपिल शर्माने कमेंट्स करत लिहिले की, 'लव्ह यू पाजी.' दर्शन कुमारने लिहिले की, 'धन्यवाद धरमजी.' राहुल देव यांनी लिहिले की, 'धर्मेंद्रजी तुमच्यावर प्रेम आहे.' त्याचवेळी, धर्मेंद्रच्या अनेक चाहत्यांनी त्यांना तुम्ही नेहमी आनंदी आणि निरोगी राहा, अशा कमेंट्स केल्या आहेत. 'तुम्हाला असे पाहून आनंद झाला.', असल्याचे मत देखील अनेकांनी व्यक्त केले आहे.

नुकताच धर्मेंद्र यांची नात निकिता चौधरी हिचे लग्न उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी संपूर्ण देओल कुटुंबीय जयपूरमध्ये उपस्थित होते. निकिता ही धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मोठी मुलगी अजिता देओल यांची मुलगी आहे. अजिताला आणखी एक मुलगी प्रियांका असून दोघीही वडिलांप्रमाणे डेंटिस्ट आहेत. निकिताच्या लग्नाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये बॉबी देओल 'ॲनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT