Rahul Vaidya आणि Disha Parmar ने पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, VIDEO पाहून सांगा कोणासारखी दिसते?

Rahul Vaidya And Disha Parmar Daughter Navya Video: राहुल आणि दिशाच्या मुलीची झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक होते. अखेर या कपलने आपल्या मुलीचा चेहरा जगाला दाखवला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Rahul Vaidya And Disha Parmar Daughter Navya Video
Rahul Vaidya And Disha Parmar Daughter Navya VideoSaam Tv
Published On

Rahul Vaidya- Disha Parmar Daughter:

प्रसिद्ध गायक राहुल वैद्य (Rahul Vaidhya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) सध्या आपल्या मुलीसोबत कॉलिटी टाइम इन्जॉय करत आहेत. आई-बाबा झाल्यापासून हे कपल चर्चेत आहेत. नुकताच राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी आपल्या मुलीचा पहिल्यांदाच चेहरा दाखवला आहे. राहुल आणि दिशाच्या मुलीची झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक होते. अखेर या कपलने आपल्या मुलीचा चेहरा जगाला दाखवला आहे. राहुल-दिशाच्या मुलीचा क्युट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांची मुलगी खूपच गोंडस दिसत आहे.

'बडे अच्छे लगते हैं 3' फेम अभिनेत्री दिशा परमार आणि 'बिग बॉस 14' मध्ये दिसलेला राहुल वैद्य 20 सप्टेंबर 2023 ला आई-बाबा झाले. पहिली मुलगी झाल्याने ते खूपच आनंदी आहेत. घरामध्ये लक्ष्मीच्या आगमनाने दोघांचेही कुटुंबीय खूपच आनंदी आहेत. आतापर्यंत राहुल आणि दिशाने आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. पण आता पहिल्यांदाच राहुलने मीडियाच्या समोर आपल्या चिमुकलीचा चेहरा दाखवला आहे. राहुलच्या मुलीला पहिल्यांदाच पाहून सर्वजण खूपच आनंदी झाले आहेत.

विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल आणि दिशा आपल्या मुलीसोबत डोहाला व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले आहेत. अशामध्ये मुंबई एअरपोर्टवर पापाराझींनी त्यांना स्पॉट केले. यावेळी राहुल आणि दिशाने आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली. त्यांनी आपल्या मुलीचे नाव नव्या ठेवले आहे. नव्या खूपच क्युट दिसत आहे. पापाराझींनी यावेळी दोघांना त्यांच्या मुलीचे नाव काय आहे हे विचारले. यावेळी राहुलने पापाराझींना विचारले की, माझी मुलगी नक्की कोणासारखी दिसते. आईसारखी की माझ्यासारखी? तर पापाराझींनी त्याला नव्या तुझ्यावर गेली असल्याचे सांगितले. हे ऐकून राहुल खूपच आनंदी होतो.

Rahul Vaidya And Disha Parmar Daughter Navya Video
Mithun Chakraborty Health Update: 'मी आता पूर्णपणे बरा आहे', मिथुन चक्रवर्तींना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स देखील यावर कमेंट्स करत राहुलच्या मुलीचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट्समध्ये लिहिले की, 'नव्या हुबेहूब राहुल वैद्यसारखी दिसते.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'पूर्णपणे राहुलसारखीच.' अनेकांनी नव्याच्या गोंडसपणाचे कौतुक केले आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, यावेळी राहुलने निळ्या रंगाचा ब्लेझर, काळा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जिन्स परिधान केली आहे. तर दिशा काळ्या रंगाचा फुल-स्लीव्ह टी-शर्ट आणि हिरव्या रंगाच्या कार्गो पँटमध्ये दिसत आहे. तर त्यांनी नव्याला पांढरा आणि काळा रंगाचा पोल्का डॉट प्रिंट वन्सी आणि गुलाबी हेडबँड घातला होता. गुलाबी रंगाचे शूज घातलेली नव्या खूपच क्युट दिसत आहे. सध्या राहुल आणि दिशाचे चाहते या व्हिडीओला खूप चांगली पसंती देत आहेत.

Rahul Vaidya And Disha Parmar Daughter Navya Video
Bhool Bhulaiyaa 3: खरंच अक्षय कुमार 'भूल भुलैया 3'मध्ये दिसणार आहे का?, दिग्दर्शकाने आता स्पष्टपणेच सांगितले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com