Ghungarachi Chaal: कलाकाराच्या जगण्याचा आकांत, 'घुंगराची चाळं' नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi New Song: एका कलाकाराच्या संघर्षाची खरी कहाणी कलावंत मराठी प्रस्तुत ‘घुंगराची चाळं’ गाण्यामार्फत मांडली आहे. खरतरं या गाण्याच्या टिझरनंतर सोशल मीडियावर गाण्याचं भरभरून कौतुक झालं. आता हे गाणं रिलीज झालं आहे.
Ghungarachi Chaal Song Out
Ghungarachi Chaal Song OutSaam Tv
Published On

Ghungarachi Chaal Song:

मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन चित्रपट, गाणी भेटीला येत असतात. सध्या तर चांगल्या धाटणीचे आणि सत्य घटनेंवर आधारित चित्रपट आणि गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकांकडून देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये आता आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कलाकारांच्या जगण्याचा आकांत सांगणारे ‘घुंगराची चाळं’ हे नवं गाणं नुकताच रिलीज झाले आहे. या गाण्याला खूप चांगली पसंती मिळत असून सध्या ते चर्चेत आले आहे.

कलाकाराचं आयुष्य सोप्प नसतं. कलाकार हे खूप मेहनत, जिद्द, काबाडकष्ट, मानअपमान तसंच संघर्ष कित्येक वर्षे करत असतो. तो दिवसागणिक घडत असतो. अशाच एका कलाकाराच्या संघर्षाची खरी कहाणी कलावंत मराठी प्रस्तुत ‘घुंगराची चाळं’ गाण्यामार्फत मांडली आहे. खरतरं या गाण्याच्या टिझरनंतर सोशल मीडियावर गाण्याचं भरभरून कौतुक झालं. आता नुकतच हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

'घुंगराची चाळं' हे गाणं कलाकार किरण कोरे याच्यावर चित्रीत झालं असून यात सुप्रसिद्ध लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर, निकीता भोरपकर आणि निलेश मुणगेकर हे कलाकार देखील दिसत आहेत. हे गाणं दर्शन घोष यांनी लिहीलं असून त्यांनीच याचे दिग्दर्शन देखील केलं आहे. हे गाणं शुभम दुर्गुळे याने गायलं असून या गाण्याचे बोल ही त्यानेच लिहीले आहेत. या गाण्याचं संगीत विपुल कदम यांनी केले असून निर्मिती निलेश मुणगेकर यांनी केली आहे.

Ghungarachi Chaal Song Out
Rahul Vaidya आणि Disha Parmar ने पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, VIDEO पाहून सांगा कोणासारखी दिसते?

'घुंगराची चाळं' हे फक्त गाणं नसून यामध्ये लाखो कलाकारांच्या जगण्याचा आकांत दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हे गाणं प्रत्येकाच्या मनाला भावते. या गाण्यासाठी सर्वच कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणं रिलीज होताच त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या गाण्याचीच सगळीकडे चर्चा होत आहे. या गाण्याला आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Ghungarachi Chaal Song Out
Ramsha Farooqui: 'जाऊ बाई गावात' शो जिंकल्यानंतर रमशा फारुकीची मोठी घोषणा, बक्षीसाची पूर्ण रक्कम शाळेसाठी करणार दान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com