Stree 2 online Leaked Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stree 2 Teaser Leaked : ‘स्त्री २’चा टीझर ऑनलाइन लीक, मिळणार हॉरर- कॉमेडीचा जबरदस्त तडका; प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री करणार कॅमिओ

Stree 2 Teaser Leaked Tamanna Bhatia : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटाचा टीझर ‘मुंज्या’ चित्रपटाच्या शोसोबत रिलीज झालेला आहे. टीझर सोशल मीडियावर रिलीज होण्यापूर्वीच ऑनलाईन लीक झाला.

Chetan Bodke

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झालेला आहे. ‘मुंज्या’ चित्रपटाच्या शोसोबत ‘स्त्री २’चा टीझरही रिलीज झालेला आहे. अद्याप हा टीझर सोशल मीडियावर रिलीज झालेला नाही. पण त्यापूर्वीच ह्या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लीक झालेला आहे. अशातच ‘स्त्री २’मध्ये प्रेक्षकांना टॉलिवूड अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. ती या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आहे. तमन्ना भाटिया या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्री शेवटची ‘अरनामनाई ४’ या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटाने टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये दमदार कमाई केलेली आहे. ‘स्त्री २’च्या निमित्ताने तमन्नाच्या दिलखेचक अदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. एका युजरने हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे.

‘जेलर’ मधील ‘कावाला’ किंवा ‘अरनमनई ४’मधलं ‘अचाचो’ गाण्यामुळे ती तुफान चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती फक्त अभिनय करणार आहे की कोणत्या गाण्यामध्येही परफॉर्मन्स करणार आहे, अद्याप हे गुलदस्त्यात आहे.

'स्त्री २' या टीझर पाहिल्यानंतर चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका बघायला मिळणार आहे. 'हमने आपकी चोटी काट दी थी. गरम तेल से मसाज करेंगी तो फट से वापस आ जाएंगे. हम पलट रहे हैं.. बस आप हमारे कपड़े मत निकालना प्लीज.... हम दोस्त हैं ना.....', हा राजकुमार रावचा डायलॉग टीझरच्या शेवटी ऐकू येत आहे. हा टीझर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

‘स्त्री २’ बद्दल बोलायचे तर, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना, श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हॉरर-कॉमेडी ‘स्त्री २’ चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा सिक्वेल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विलेपार्ले येथील जैन मंदिरावर के-पूर्व प्रभाग कार्यालयाने केलेली तोडक कारवाई योग्यच

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

Ratnagiri To Kolhapur Travel: रत्नागिरीहून कोल्हापूरला कसे जाल? वाचा सर्वोत्तम वाहतूक पर्याय आणि ट्रॅव्हल टिप्स

SCROLL FOR NEXT