Tamannaah Bhatia Summoned: तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलने पाठवले समन्स; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Tamannaah Bhatia Summoned By Maharashtra Cyber Cell: टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ झालेली आहे. नुकतंच महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियाला समन्स बजावले आहे.
Bollywood Actress Tamannaah Bhatia Summoned By Maharashtra Cyber Cell In Illegal IPL Streaming Case
Bollywood Actress Tamannaah Bhatia Summoned By Maharashtra Cyber Cell In Illegal IPL Streaming CaseInstagram

Tamannaah Bhatia Summoned In Illegal IPL Streaming Case

टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ झालेली आहे. नुकतंच महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियाला समन्स बजावले आहे. तमन्नाने २०२३ मध्ये आयपीएलचा सामना फेअरप्ले अ‍ॅपवर (Fairplay App) लाईव्ह स्ट्रीम केले होते. यामुळे व्हायाकॉम कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झाले होते. याप्रकरणी अभिनेत्रीला येत्या २९ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.

Bollywood Actress Tamannaah Bhatia Summoned By Maharashtra Cyber Cell In Illegal IPL Streaming Case
Mahesh Manjrekar On Trollers: "आई, बायको आणि मुलीवरून ट्रोल केल्यास शोधून कानफटवेन"; महेश मांजरेकरांकडून ट्रोलर्संना सज्जड दम

दरम्यान, या प्रकरणामध्येच मंगळवारी (२३ एप्रिल) बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र संजय दत्त मंगळवारी चौकशीला हजर झाला नाही. मात्र, संजय दत्तने चौकशीसाठी आणखी वेळ मागितला आहे. संजय दत्तने सायबर सेलला दिलेल्या माहितीनुसार,, काही नियोजित कामांमुळे मुंबईबाहेर असल्याने २३ एप्रिलला चौकशीसाठी उपस्थित राहू शकला नाही.

तमन्ना भाटियाला समन्स का पाठवले?

महाराष्ट्र सायबर सेलने व्हायकॉमच्या तक्रारीवरून फेअरप्ले अ‍ॅपविरोधात एफआयआर नोंदवला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तमन्नाची चौकशी करण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तमन्ना भाटियाने फेअरप्लेची जाहिरात केली होती, त्यामुळे तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सायबर पोलिसांना अभिनेत्रीकडून हे समजून घ्यायचंय की तिला जाहिरात करण्यासाठी तिच्यासोबत कोणी संपर्क साधला होता?, तिला ही जाहिरात कशी मिळाली ?, या जाहिरातीसाठी अभिनेत्रीला किती मानधन मिळाले ? यासाठी अभिनेत्रीला महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलवले आहे.

Bollywood Actress Tamannaah Bhatia Summoned By Maharashtra Cyber Cell In Illegal IPL Streaming Case
Arijit Singh Birthday: बॉलिवूडमधील महागडा गायक; आज आहे कोट्यवधींचा मालक पण जगतो साधं आयुष्य

वायकॉमने दिलेल्या तक्रारीनुसार, फेअरप्ले अ‍ॅपने टाटा आयपीएल (Indian Premier League) २०२३ चे अनधिकृतरित्या स्क्रीनिंग केले होते. त्यामुळे वायकॉमला तब्बल १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच या प्रकरणी, महाराष्ट्र सायबर सेलने रॅपर बादशाहचाही जबाब नोंदवला आहे.

तपासामध्ये, फेअरप्ले कंपनीने वेगवेगळ्या बँक अकाऊंटमधून कलाकारांना पैसे दिल्याचेही पोलिस चौकशीमध्ये समोर आले. संजय दत्तला प्ले व्हेंचर नावाच्या कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले होते, ही कंपनी कुराकाओ येथील आहे. बादशाहला लायकोस ग्रुप एफझेडएफ कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले, ही कंपनी दुबईची आहे, तर जॅकलिन फर्नांडिसला ट्रिम जनरल ट्रेडिंग एलएलसी नावाच्या कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले, ही कंपनीही दुबईतील आहे.

Bollywood Actress Tamannaah Bhatia Summoned By Maharashtra Cyber Cell In Illegal IPL Streaming Case
Pushkar Shrotri: पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार खास, 'आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

फेअरप्ले व्यतिरिक्त, महाराष्ट्र सायबरकडून एफआयआरमध्ये पिकाशो या ॲपचेही नाव आरोपी म्हणून नमूद केले आहे. या ॲपची चौकशी केली असता, ॲप्लिकेशनला गुगल ॲडसेन्समधून मिळणारा पैसा पाकिस्तानात जात असल्याचे आढळले. गुगलकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिकाशो ॲपवर युजर्सला नवीन रिलीज झालेले चित्रपट आणि वेबसीरीज उपलब्ध आहे. यासंबंधितही पोलिस सध्या चौकशी करीत आहेत.

Bollywood Actress Tamannaah Bhatia Summoned By Maharashtra Cyber Cell In Illegal IPL Streaming Case
Mrunal Dusanis: 'ती आमच्यासाठी आशीर्वाद आहे...' मृणाल दुसानिसने सांगितला लेकीच्या नावाचा अर्थ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com