सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित (Director Siddharth Anand) ‘फायटर’ (Fighter Film) चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाची पहिली झलक, गाणी, ट्रेलर आणि दीपिका-हृतिकची लव्हस्टोरी यामुळे चित्रपटाची चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ आहे.
चित्रपटामध्ये असलेल्या कलाकारांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे आवडत्या सेलिब्रिटींचा चित्रपट पाहण्साठी फॅन्सने थिएटरमध्ये एकच गर्दी केलेली दिसत आहे. जरीही चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असली तरी, चित्रपटाने पहिल्या दिवशी इतकी खास कमाई केली नाही. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा. (Bollywood Film)
दीपिका-हृतिक मुख्य भूमिकेत असलेला 'फायटर' चित्रपट देशातील पहिला एरियल ॲक्शन चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. नुकताच सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी २२ कोटींचा टप्पा गाठला आहे. ही फक्त एक प्राथमिक माहिती असून अद्याप निर्मात्यांकडून चित्रपटाच्या कमाईचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. या कमाईमध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतो. चित्रपटाने रिलीजच्याच आधी अफलातून कमाई केली असल्याची चर्चा होत होती. (Bollywood News)
येत्या २६ जानेवारीला आणि विकेंडला चित्रपट कशी कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक समीक्षकांनीही चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. अनेकांनी हृतिकच्या अभिनयाला सर्वाधिक पसंदी दर्शवली असून त्याचे कौतुक केले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ चित्रपटही २०२४ मधील बेस्ट ओपनर चित्रपटांच्या यादीत सामील होईल, अशी चाहत्यांमध्ये चर्चा होती. पण असं काही घडलेलं दिसून येत नाही. ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. अशाच अपेक्षा चाहत्यांच्या ‘फायटर’कडूनही होत्या, पण चाहत्यांच्या ह्या अपेक्षाभंग झालेल्या दिसत आहे. (Latest Marathi News)
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अर्थात २५ जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच ऋषभ साहनी, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख ही स्टारकास्ट सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.