‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो फिर मैं अपनी भी नहीं सुनता…’ हा ‘वॉन्टेड’ चित्रपटातील सलमान खानचा हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. हाच डायलॉग भाईजानने त्याच्या रियल लाईफमध्येही त्याने सत्यात उतरवुन दाखवला आहे. सलमान खान खरंतर आजवर अनेकदा लोकांच्या मदतीला धावला आहे. फक्त सेलिब्रिटींच्याच नाही तर, अनेकदा त्याने फॅन्सलाही एक हात मदतीचा देत आपल्या लाडक्या चाहत्यांचे जीव वाचवले.
सध्या सलमानचा आणि त्याच्या लहानग्या चाहत्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सलमान चाहत्यासोबत बोलताना दिसत आहे. या फोटोबद्दल जी माहिती समोर आली आहे, ती वाचून तुम्हालाही सलमान खानचं कौतुक वाटेल.
भाईजान नुकताच एका ९ वर्षीय जगनबीर नावाच्या चिमुकल्याला भेटला. त्या ९ वर्षीय जगनबीरने ९ वेळेस किमोथेरेपी झाल्यानंतर कॅन्सरला हरवले आहे. सलमान खानने (Salman Khan) २०१८ मध्ये जगनबीरची पहिल्यांदा भेट घेतली होती.
जगनबीरची आणि भाईजानची भेट मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती. तेव्हा तो ४ वर्षांचा होता. त्यावेळी कॅन्सरविरुद्धची लढाई यशस्वीपणे पार केल्यानंतर सलमानने जगनबीरला पुन्हा एकदा भेटण्याचा शब्द दिला होता.
जगनबीरने कॅन्सरविरोधातली लढाई जिंकली असून तो पूर्णपणे बरा झालेला आहे. गेल्या वर्षी जगनबीरने कॅन्सरवर मात केल्यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये सलमानने त्याची वांद्रे येथील घरी भेट घेतली.
'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत जगनबीरची आई सुखबीर कौर यांनी सांगितलं की, वयाच्या तिसऱ्या वर्षी जगनबीरच्या मेंदूमध्ये एका कॉईनच्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याची दृष्टीही कमी होऊ लागली होती. अशा परिस्थितीत आम्हाला डॉक्टरांनी त्याच्यावर दिल्ली किंवा मुंबईमध्ये उपचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर जगनबीरच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला. चिमुकल्या जगनला विश्वास होता की, तो सलमान खानला नक्कीच भेटेल."
जगनबीरची आई सुखबीर कौर यांनी पुढे सांगितलं की, "जगनबीरला त्याची खरी परिस्थिती सांगायची नाही, असा आम्ही निर्णय घेतला होता. जगनबीर जेव्हा रुग्णालयात उपचार घेत होता, तेव्हा त्याचा एक व्हिडीओ बनवण्यात आला होता. यातून त्याने सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा व्हिडीओ सलमानपर्यंत पोहोचला. त्यानंतर सलमानने त्याला भेटून त्याची इच्छा पूर्ण केली. सलमानला भेटल्यानंतर तो खूपच आनंदित होता. त्याला आता व्यवस्थित दिसत असून आता तो शाळेतही जातो."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.