२६ जानेवारी रोजी संपूर्ण देशभरामध्ये '७५ वा प्रजासत्ताक दिन' मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. यावेळी भारतामध्ये सर्वत्र देशभक्तीचे वातावरण असते. अशा परिस्थितीत २६ जानेवारीला तुम्हीही OTT वर घरबसल्या देशभक्तीवर आधारित चित्रपट पाहून तुमचे मनोरंजन करू शकता. आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये देशभक्तीची भावना दाखवण्यात आली आहे. तसेच हे उत्तम चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील.
शाहरूख खान आणि गायत्री जोशीने 'स्वदेस' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. मोहन भार्गव नावाच्या नासातील एका वैज्ञानिकाचे पात्र साकारले. त्याने चित्रपटात साकारलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला असून चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडची सुपरस्टार आलिया भट्टचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला 'राझी' चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा एक देशभक्तीपर चित्रपट असून चित्रपटात आलियाने भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.
विकी कौशल प्रमुख भूमिकेत असलेला 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट तुम्ही 'झी५' Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. भारतीय लष्कराने २०१६ मध्ये पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या कथेवर आधारित आहे.
'मिशन मजनू' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने एका भारतीय गुप्तहेराची कथा दाखवली आहे. हा चित्रपट तुम्हाला Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असलेला 'शेरशाह' चित्रपटामध्ये कारगिल युद्धाचा नायक आणि भारतीय लष्कराचा शूरवीर विक्रम बात्रा यांची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. तुम्ही हा चित्रपट Amazon Prime Video या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
सुपरस्टार आमिर खानच्या 'रंग दे बसंती' या मल्टीस्टारर चित्रपटात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा त्याग दाखवण्यात आला आहे. तसेच, सध्याच्या काळात तरुणाई स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान कसे विसरत चालली आहे, हेही हा चित्रपट सांगतो. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहायला मिळेल.
'मंगल पांडे: द रायझिंग' हा चित्रपट मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. केतन मेहता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून आमिर खानने मंगल पांडेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्हाला Amazon Prime Video या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.