Devra Movie canva
मनोरंजन बातम्या

Devra Movie: 'देवरा पार्ट १' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घसरगुंडी; तिसऱ्या दिवशी केली इतक्याच कोटींची कमाई

Devra Movie Box Office Collection day 3: साउथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा 'देवरा पार्ट १' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घ्या.

Saam Tv

साउथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा 'देवरा पार्ट १' हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपट प्रदर्शत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

'देवरा पार्ट १' या चित्रपटाच्या माध्यामातून अभिनेता सैफ अली खान याने टॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. या चित्रपटामध्ये सैफने खलनायकाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक चित्रपटामधील सैफच्या अभिनयाला भरपूर पसंती देत आहेत. यापूर्वी सैफने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारल्या आहेत.

'देवरा पार्ट १' या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पंरतु दुसऱ्या दिवशी चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ४०.३ कोटीं रुपयांचा गल्ला गाठला आहे. तिसऱ्या दिवशी देखील चित्रपटाच्या कमाईमध्ये १० टक्क्यांनी घट झालेली पाहायला मिळाली आहे. ज्युनियर एनटीआरचा 'देवरा पार्ट १' हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल ३०० कोटींचा खर्च झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८२.२ कोटींचा गल्ला गाठला होता. पहिल्या दिवशी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल क्रेझ पाहायला मिळाली होती. मात्र दुसऱ्या दिवसापासून ती उत्सुकता कमी झाली की काय असा प्रश्न निर्माण होतो.

'देवरा पार्ट १' या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआरची दुहेरी भूमिका पाहायला मिळत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेने देखील अभिनय केला आहे. या चित्रपटाची निर्मिती युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर आर्ट्स यांनी केली आहे. हा चित्रपट ज्युनियर एनटीआरचा ३०वा चित्रपट आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

SCROLL FOR NEXT