Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Weather Alert For Maharashtra: राज्यात आज तुफान पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कुठे कसा पाऊस पडणार वाचा सविस्तर....
Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Rain News in MaharashtraSaam TV
Published On

राज्यात गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा चांगला जोर पकडला आहे. सध्या राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. आजपासून पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे असणार आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत देखील आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील मुसळधार पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरीत भागात म्हणजे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमधील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यात आहे. या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज नागपूर सह पूर्व विदर्भातील सर्व ६ जिल्ह्यात तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण असून आज दमदार पावसाची अपेक्षा आहे.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com