
पालघरमध्ये तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली. पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्टवर हा गोळीबाराचा थरार घडला. या गोळीबारात अल्पवयीन मुलगी तेजल जखमी झाली. जखमी मुलीची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. रिवॉल्वर दाखवताना गर्लफ्रेंडला चुकून गोळी लागल्याचा दावा तरुणाने केला. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. मागील आठवड्यात देखील केळवे येथे एका तरुणीचा रिसॉर्टमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता या गोळीबाराच्या घटनेने केळवे परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील केळवा पर्यटनस्थळी काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका रिसॉर्टमध्ये आज दुपारी गोळीबाराची घटना घडली. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या बॉयफ्रेंडने गोळी झाडली. या गोळीबारात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या मुलीवर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी बोईसर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीची प्रकृती गंभीर आहे.
केळवे राखाडे येथील एका खासगी हॉटेलमध्ये आलेल्या बोईसर येथील तेजल (१७ वर्षे) या अल्पवयीन मुलीवर दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तिच्यासोबत असणाऱ्या बॉयफ्रेंडने तिच्यावर गोळी झाडली. पण बंदुक दाखवत असताना अचानक गोळी सुटून तरुणी गंभीर जखमी झाली, अशी माहिती तरुणाने पोलिसांना दिली. तेजलच्या मानेवर गोळी लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आली.
दुपारी एक ते दीडच्या सुमारास माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रात या गंभीर असणाऱ्या तेजलला आणण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी तिला पालघर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र या तरुणीची प्रकृतीं खूपच गंभीर असल्याने लीला बोईसर येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालघर बोईसर परिसरात मोकळेपणाने बंदुकी आणि शस्त्र उपलब्ध असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.