Palghar News : विवाहित महिला बॉयफ्रेंडसोबत रिसॉर्टमध्ये, अचानक प्रकृती बिघडली अन् अकाली मृत्यू; आलिशान हॉटेलमध्ये काय घडलं?

Palghar Girlfriend Dies in Resort : डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. घटनेची माहिती केळवे पोलिसांना मिळाल्यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.
Palghar Girlfriend Dies in Resort
Palghar Girlfriend Dies in Resort Saam Tv News
Published On

पालघर : प्रियकरासोबत रिसॉर्टमध्ये आलेल्या एका विवाहित महिलेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये घडली आहे. २७ वर्षीय महिलेच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला असून पोलिसांकडे चौकशीची मागणी केलीय. या घटनेमुळे केळवे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विवाहित महिला ही आपल्या प्रियकरासोबत रिसॉर्टमध्ये आली होती. यादरम्यान असं काही घडलं की, ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारा पर्यटनासाठी सुप्रसिद्ध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आणि हॉटेल आहेत. केळवे येथील दर्या निवास या रिसॉर्टमध्ये ही विवाहित महिला आणि तिचा अविवाहित प्रियकर मयूर साळुंखे (वय २५) हे दोघेजण राहण्यासाठी आले होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिला श्वसनाचा त्रास झाला. त्यानंतर तिला माहीम येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Palghar Girlfriend Dies in Resort
Tata Steel Manager : मुंबईहून घरी परतले, टाटा स्टीलच्या मॅनेजरनं आपल्या कुटुंबासह आयुष्य संपवलं; नातेवाईकांवर शोककळा

डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. घटनेची माहिती केळवे पोलिसांना मिळाल्यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. मृत महिला ही विरारच्या आगाशी परिसरातील रहिवासी आहे. तिच्या कानामधून रक्तस्त्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूमागे काहीतरी वेगळं कारण असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

विवाहित महिलेत्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. विवाहित महिलेचे नातेवाईक गंभीर आरोप करताना दिसत आहेत. तिचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने विविध चर्चांना उधाण आलंय.

Palghar Girlfriend Dies in Resort
Raigad Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 1 ट्रक, 3 कार आणि ३ बसेस एकमेकांवर आदळल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com