Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Washim News : राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय झाला आहे. पुण्यासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. तर वाशीम जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Rain Alert
Rain AlertSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: मागील तीन- चार दिवसांपासून राज्यभरातील अनेक भागात पाऊस सुरु आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय झाला आहे. पुण्यासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. तर वाशीम जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यानं विविध मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

Rain Alert
Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

भिवंडीत अनेक ठिकाणी साचले पाणी 

भिवंडी शहरात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील तीनबत्ती बाजारपेठमध्ये पाणी साचले आहे. तसेच अनेक लहान- मोठ्या दुकानात देखील पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता असून परिसरात आपत्ती विभागाची टीम दाखल झाली आहे. तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Rain Alert
Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

भीमाशंकर घाटमाथ्यावर पावसाची संततधार

भीमाशंकर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे चास कमान धरणात जलसाठा ७३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्या भिमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com