Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Sambhajinagar News : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात वारकरी आणि भाविकांची मांदियाळी जमली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक आषाढी वारी करत पंढरपूरमध्ये दाखल होत विठुरायाचे दर्शन घेत आहेत
London Pandharpur Wari
London Pandharpur WariSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : पंढरपूरहुन विठ्ठल- रुक्मिणीच्या पादुका घेऊन पंढरीची वारी थेट लंडनच्या दारी पोहोचली आहे. ७० दिवसात २२ देशांमधून सुमारे १८ हजार किमीचा प्रवास करत वारी लंडनमध्ये दाखल झाली आहे. आज आषाढी एकादशी निमित्ताने लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष करत भारतीय भाविकांनी पांडुरंगाच्या पादुका दर्शनाचा लाभ घेतला. 

लंडन इथं राहणारे अनिल खेडकर यांच्या पुढाकाराने पंढरपूर ते लंडन अशी ही वारी यंदा प्रथमच काढण्यात आली होती. दरम्यान आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात वारकरी आणि भाविकांची मांदियाळी जमली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक आषाढी वारी करत पंढरपूरमध्ये दाखल होत विठुरायाचे दर्शन घेत आहेत. इतकेच नाही तर राज्यभरात आषाढी एकादशी साजरी होत आहे. त्यानुसार लंडनमध्ये देखील आषाढीनिमित्त हरिनामाचा जयघोष पाहण्यास मिळत आहे. 

London Pandharpur Wari
Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

वारीचे स्वागत करत हरिनामाचा जयघोष 

भारतातील लंडन येथे राहणाऱ्या जनसमुदायाने १४ एप्रिलला पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडनवारी सुरू केली. ही वारी ७० दिवसांचा प्रवास करत आशिया आणि युरोप हे दोन खंड ओलांडून २२ देशांतून प्रवास करत २२ जून २०२५ ला लंडनमध्ये पांडुरंगाच्या पादुका घेऊन पोहोचली आहे. लंडनच्या टॉवर ब्रिज जवळ येथील भारतीयांनी वारीचे परंपरेने जोरदार स्वागत झाले. यावेळी हरिनामाचा जयघोष करण्यात आला. 

London Pandharpur Wari
Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

पंढरीच्या वारीचा अनुभव 

दरम्यान लंडनमध्ये टॉवर ब्रिज जवळ ढोल पथक व भगवी पताका घेऊन असलेले वारकरी यावेळी पाहायला मिळाले. या वारीमध्ये येथे आषाढी एकादशी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून हे वारकरी सातासमुद्रापार लंडनमध्ये आषाढी एकादशी साजरी करत आहेत. आज एकीकडे महाराष्ट्रात वारीचा जयघोष सुरू असताना लंडनमध्ये देखील विठू नामाचा गजर घुमला असून पंढरीच्या वारीचे वातावरण लंडनमध्ये राहाणाऱ्या मराठी माणसाला या निमित्ताने अनुभवता येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com