Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Nanded News : नांदेड जिल्ह्यात सोयाबीन बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. बोगस बियाणे मिळाल्याने पेरणी केल्यानंतर अनेक दिवस झाल्यानंतर देखील सोयाबीन उगवले नसल्याचे समोर आले
Bogus Soyabean Seeds
Bogus Soyabean SeedsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: पाऊस पाडल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मात्र लागवड केलेल्या सोयाबीन बियाणात शेतकऱ्यांची फसवणूक करत बोगस बियाणे देण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे. यामुळे पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान सोयाबीनची दुबार पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. 

मॉन्सूनची चाहूल लागताच शेतकरी बियाणे खरेदीला लागत असतो. मात्र या बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार दरवर्षी समोर येत असतात. बोगस बियाणे विक्री केली जात असते. अशाच प्रकारे नांदेड जिल्ह्यात सोयाबीन बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. बोगस बियाणे मिळाल्याने पेरणी केल्यानंतर अनेक दिवस झाल्यानंतर देखील सोयाबीन उगवले नसल्याचे समोर आले आहे. 

Bogus Soyabean Seeds
Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

नांदेड जिल्ह्यात ५०० हुन अधिक तक्रारी 

नांदेड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचा संकट ओढवलं आहे. पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर ही दुबार पेरणीची वेळ आली. नांदेड जिल्ह्यात पाचशेच्या वर बियाणं उगवलं नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अशा बोगस बियाणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

Bogus Soyabean Seeds
Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड 

काही ठिकाणी कृषी विभागाने जाऊन पंचनामे देखील केले. परंतु त्यांचा अहवाल येईपर्यंत पेरणीची वेळ निघून जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अहवालाची वाट न बघता दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. पेरलेलं बियाणं उगवलं नसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com