
काल सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीए परीक्षेत संभाजीनगरच्या लेकाने घवघवीत यश मिळवलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राजन काबराने देशात पहिली रँक प्राप्त केली आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सात विद्यार्थ्यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. (CA Result 2025)
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने मे महिन्यात सीएची परीक्षा (CA Exam) घेतली होती. या परीक्षेचा काल निर्णय लागला.राजन काबराने महाराष्ट्राचे नाव देशात मोठं केलं आहे. राजनने अवघ्या २२ व्या वर्षी सीए परीक्षा पास केली आहे. फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. त्याने ऑल इंडिया रँक १ प्राप्त केली आहे.
कुटुंबात दुसरा CA
राजनचे वडीलदेखील चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant)आहे. तर आई गृहिणी आहे. त्याची बहीण डॉक्टर आहे. राजनने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सीएची परीक्षा पास केली. त्याने अभ्यास करताना ICAI च्या स्टडी मटेरियलवर लक्ष दिले आणि अभ्यास केला.
राजनने याआधी सीए इंटरमीडिएटमध्येदेखील ऑल इंडिया रँक १ प्राप्त केली होती. त्याने तेव्हा ४०० पैकी ३७८ गुण प्राप्त केले होते.
राजन हा सध्या बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये इंडस्ट्रील ट्रेनी म्हणून काम करत आहे. त्याला या क्षेत्रात काम करण्याचा अनुभवदेखील आहे. राजन काबराने सीए परीक्षेत ६०० पेकी ५१६ गुण प्राप्त केले आहे. एअर इंडिया रँक १ प्राप्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.