
आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक करदात्यांनी आयटीआर फाइल केला आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी सीएची मदत लागते असे अनेकांना वाटते. परंतु तुम्ही CAशिवायदेखील आयटीआर फाइल करु शकतात. तुम्हाला स्वतः लाही ऑनलाइन आयटीआर फाइल करता येऊ शकतो. यासाठी इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर जाऊन रिटर्न फाइल करायचा आहे.
CA शिवाय आयटीआर फाइल करु शकतो का? (Can We File ITR Without CA)
हो, तुम्ही सीए शिवाय आयटीआर फाइल करु शकतात. जर तुम्ही इन्कम सॅलरी, बचत खात्यावर मिळणारे व्याजदर किंवा भाडे या काही गोष्टींवर अवलंबून असाल तर खूप सोप्या पद्धतीने आयटीआर फाइल करु शकतात. आयकर विभागाने पूर्वीपेक्षा आयटीआर भरण्याची प्रोसेस खूप सोपी केली आहे.
आयटीआर फाइल करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक? (ITR Filling 2025 Required Documents)
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे
फॉर्म 16- सॅलरीड कर्मचाऱ्यांसाठी गरजेचे
फॉर्म 26AS, AIS,TIS
बँक डिटेल्स- रिफंड जमा होण्यासाठी
गुंतवणूकीचे सर्टिफिकेट- PPF,ELSS,LIC,म्युच्युअल फंड, इन्श्युरन्स, चॅरीटी याचे कागदपत्रे
होम लोन सर्टिफेकेट
ऑनलाइन ITR कसा फाइल करावा? (How To File ITR Online At Home)
सर्वात आधी तुम्हाला incometax.gov.in वर जाऊन लॉग इन करावे.
ई-फाइलवर क्लिक करावे. त्यानंतर आयकर रिटर्नवर क्लिक करा.
यानंतर आयकर रिटर्न फाइल करा या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर AY 2025-26 सिलेक्ट करा आणि ऑनलाइन मोड निवडा.
यानंतर तुमच्या उत्पन्नानुसार ITR फॉर्म सिलेक्ट करा.
यानंतर पोर्टलवर दिलेली माहिती भरा. त्यानंतर त्यात अतिरिक्त इन्कमची माहिती भरा.
यानंतर टॅक्स कॅलक्युलेट करा आणि टॅक्स देय असेल तर भरा.
यानंतर फॉर्म वॅलिड करा आणि सबमिट करा.
आयकर रिटर्न फाइल केल्यानंतर आधार ओटीपी, नेट बँकिंगद्वारे वेरिफाय करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.