ITR Filling: १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री नाही; आयकर विभागाचा हा नियम वाचाच

Is 12 lakh Income Tax Free: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. परंतु यासाठीही काही अटी आहेत.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. यंदा बजेटमध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बजेटमध्ये १२ लाखांच्या उत्पन्नावर कर माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु हा लाभ सर्वांसाठी नाही आहे. जर तुमचे उत्पन्न १२ लाखांपेक्षा कमी असेल तरीही तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो. यासाठी काही अटी आहेत.

ITR Filling
Income Tax Return बाबत महत्त्वाची अपडेट; आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, नवी तारीख काय? वाचा सविस्तर

आयटीआर (ITR Filling) भरताना १२ लाखांच्या उत्पन्नावर कर मिळणार की नाही, असा प्रश्न करदाचे विचारत आहेत. नवीन करप्रणाली २०२५-२६ अंतर्गत १२ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार आहे. आता तुम्ही जे आयटीआर दाखल करणार आहात ते २०२४-२५ साठी असणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.

१२ लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री की नाही? (Is 12 Lakh Income Tax Free)

जर तुम्ही शेअर मार्केटमधूननफा मिळवला असेल तर ते १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त नसणार आहे. यातील नफ्याचे पैसे हे करपात्र उत्पन्नात मोजले जाणार आहे. जर तुम्ही काही ठरावीक रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली त्यावर तुम्हाला नफा झाला. तर नफा झालेल्या रक्कमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. या परिस्थितीत १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त नसणार आहे.

ITR Filling
ITR Filling: कामाची बातमी! आयटीआर फाइल करताना ही कागदपत्रे अनिवार्य; अन्यथा येईल अडचण

शेअर मार्केटमधील कमाईतील अल्पकाली नफ्यावर तुम्हाला २० टक्के कर भरावा लागणार आहे. तर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १२.५ टक्के कर भरावा लागेल. जर तुमचा दीर्घकालीन कॅपिटल गेन असेल तर तुम्हाला १२.५ लाख रुपयांच्या नफ्यावर सूट मिळणार आहे.

जर तुम्ही घर किंवा जमीन विकून नफा मिळवला असेल तर त्याचे कॅल्क्युलेशन वेगळे असते. २३ जुलै २०२४ पूर्वी खरेदी केलेल्या घरावर १२.५ टक्के कर भरावा लागेल. याचसोबत तुमच्याकडे जुन्या योजनेत इंडेक्सेशन लाभासह २० टक्के करदेखील भरता येईल.

ITR Filling
ITR Filling: ITR 1 आणि ITR 4 ऑनलाइन फॉर्म भरण्यास सुरुवात; कोण भरु शकतात हे फॉर्म?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com