Share Market Today: शेअर मार्केट जाम! सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची उसळी, १० शेअर्सची रॉकेट झेप
आठवड्याच्या व्यवहाराच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात 'हिरवळ' दिसून आली. सकाळच्या सत्रात सुरू झालेली वाढ अखेरीपर्यंत कायम राहिली. बीएसई सेन्सेक्सने (BSE Sensex) व्यवहार सुरू होताच ४०० अंकांनी उसळी घेतली. अखेरच्या सत्रात वाढ कायम राहून १००० अंकांच्या उसळीने व्यवहार बंद झाले. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी सुद्धा २७२ अंकांच्या जोरदार उसळीनं बंद झाला. देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सनं अख्खं मार्केट जाम केलं.
सेन्सेक्स, निफ्टी लय सुस्साट
बीएसई सेन्सेक्स मागील सत्रात ७९२१२.५३ वर बंद झाला होता. त्या तुलनेत सोमवारी सुरुवातच तेजीत झाली. ७९३४३.६३ अंकांवर व्यवहार सुरू झाला. त्यानंतर वेग कायम होता. शेअर बाजाराचे व्यवहार बंद होईपर्यंत बीएसई सेन्सेक्सने १००५.८४ अंक म्हणजेच १.२७ टक्क्यांच्या वाढीसह ८०२१८.३७ च्या पातळीपर्यंत पोहोचला.
तसेच एनएसई निफ्टीनेही तेजी कायम ठेवली. मागील सत्रातील २४०३९.३५ वरून झेप घेत २४०७०.२५ वर व्यवहार सुरू झाला. त्यात २८९.१५ अंकांची म्हणजेच १.२० टक्क्यांची वाढ नोंदवून २४३२८.५० अंकावर बंद झाला
रिलायन्स लय भारी
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात रॉकेट झेप घेणाऱ्या शेअर्समध्ये रिलायन्स कंपनीच्या शेअर्सचा समावेश होता. रिलायन्स शेअर आज १३४० रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. व्यवहार सुरू असताना हाच शेअर १३७४.६० रुपयांपर्यंत पोहोचला होता.
सत्राच्या अखेरीस ५.२७ टक्क्यांची जोरदार झेप घेत १३६८.५० रुपयांवर बंद झाला. शेअरमधील तेजीमुळे कंपनीचा मार्केट कॅप देखील वृद्धीसह १८.५२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे रिपोर्ट्स आहेत.
१० शेअर ठरले शेर!
रिलायन्ससह लार्जकॅपमध्ये सर्वाधिक तेजी असलेल्या टॉप १० शेअर्सबाबत सांगायचे झाले तर, सनफार्मा, टाटा स्टील, एसबीआय, एम अँड एम, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एलटी, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट यांचा समावेश आहे.
महत्वाचे : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील विशेषज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.