
आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करताना इन्कम टॅक्सचे नियम माहित असणे गरजेचे आहेत. दरम्यान, नुकताच इन्कम टॅक्सचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. ज्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, CBDT, ने आयटीआरची अनिवार्य छाननी करण्यास सांगितले आहे. याचसोबत काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आयकर विभाग करदात्यांना नोटीसदेखील पाठवू शकतो.
आयटीआर (ITR) फाइल करताना काळजीपूर्वक करा. जर आयटीआर फाइल करताना इन्कम, टॅक्स, गुंतवणूक याबाबत योग्य माहिती द्या. जर करदात्याने माहिती चुकीची दिली तर त्यांना नोटीस येऊ शकते. जर करदात्यांनी अशा परिस्थितीत कागदपत्रे तयार ठेवली तर नोटीसला उत्तर देऊन डिमांड नोटीस टाळता येईल, असं सीडीबीटने म्हटलं आहे.
आयटीआरच्या नियमांमध्ये बदल
करदात्यांनी आयटीआरच्या नियमांमध्ये बदल केले आहे. यामध्ये नवीन आयटीआर फॉर्मपासून ते स्लॅबचा समावेश आहे. त्यामुळे या नवीन नियमांनुसार तुम्हाला आयटीआर फाइल करायचा आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आयटीआर फाइल करताना छाननीसंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
आयटीआरची छाननी
१ एप्रिल २०२३ नंतर कलम 133A (133A(2A) वगळता) इतर कलमाअंतर्गत येणाऱ्या सर्वेक्षणासंबंधित परताव्यांची छाननी केली जाणार आहे.याचसोबत १ एप्रिल ते २०२३ ते १ एप्रिल २०२५ मध्ये 32A अंतर्गत केलेल्या कारवाईशी संबंधित सर्व प्रकरणांमध्येही आयटीआर फाइल करता येणार आहे. रद्द केलेल्या रजिस्ट्रेशचीदेखील पडताळणी केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.