ITR Filling: आयटीआर कसा फाइल करावा? ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

ITR Filling 2025: आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने फाइल करता येतो.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करण्याची मुदत यावर्षी वाढवण्यात आली आहे. या वर्षी तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर भरु शकतात. आयटीआर फाइल करण्याची ऑनलाइन प्रोसेस अजूनपर्यंत सुरु झालेली नाही. परंतु तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आयटीआर भरु शकतात. यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सुरु करा. ३ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे.

ITR Filling
ITR Filling 2025: आयटीआर फाइल करण्याची योग्य वेळ कोणती? या तारखेनंतरच भरा; अन्यथा रिफंड येण्यास येतील अडचणी

ऑफलाइन आयटीआर कसा फाइल करावा? (How To File ITR Offline)

सर्वात आधी तुम्हाला युटिलिटी डाउनलोड करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला incometax.gov.in या वेबसाइटवर जाऊन आयकर रिटर्नवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला आर्थिक वर्ष दिसेल त्यामध्ये २०२५-२६ वर क्लिक करा. यानंतर ITR 1 साठी एक्सेल युटिलिटीवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर ते डाउनलोड करा.

यानंतर डाउनलोड केलेली फाइल ओपन करा. त्यानंतर मायक्रो इनेबल करा.

यानंतर तुमची सर्व माहिती भरा. यामध्ये वैयक्तिक माहिती, उत्पन्न, डिडक्शन, टॅक्स, फॉर्म १६,फॉर्म 26AS, AIS याचा समावेश असेल.

यानंतर तुम्ही वॅलिडेट करा. यानंतर कोणतीही अडचण आली तर तो प्रॉब्लेम सोडवा.

यानंतर तुम्हाला JSON वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर फाइल सेव्ह करा.

यानंतर पुन्हा इन्कम टॅक्सच्या साइवर जा. पुन्हा एकदा ई-फाइल टॅबवर जाऊन आयटीआर फाइलवर क्लिक करायचे आहे.

यावर आर्थिक वर्ष, फायलिंग मोड, ऑडिटिंग किंवा पॉलिटिल पार्टीच्या इथे No सिलेक्ट करायचा आहे.

यानंतर तुम्हाला आयटीआर -१ निवडायचे आहे. त्यानंतर JSON फाइल अपलोड करायची आहे.

आयटीआर फाइल करताना तुम्हाला ओटीपी, नेट बँकिंग, ईवीसी हे वेरिफाय करावे लागेल त्यानंतर सबमिट करावे लागेल.

ऑनलाइन पद्धतीने आयटीआर कसा फाइल करायचा? (How To File ITR Online)

सर्वात आधी तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करा. यानंतर लॉग इन करा. यानंतर तुम्हाला जो आयडी पासवर्ड दिला आहे तो टाका.

यानंतर तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्म निवजा.

यानंतर तुम्हाला फॉर्म 26AS आणि AIS मधील डेटा दिसेल. त्यामध्ये जिथे काही बदल करायचे असतील तिथे करा.

यानंतर कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म १६ अपलोड करण्याची गरज पडत नाही परंतु हा फॉर्म तुम्ही वेरिफाय करा.

यानंतर सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो टाकून वेरिफाय करा.

ITR Filling
ITR Filling: आयटीआर फाइल करताना 'या' चुका कधीच करु नका; येईल आयकर विभागाची नोटीस

कागदपत्रे (ITR Filling Required Documents)

फॉर्म 16

फॉर्म 26AS

अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट(AIS)

बँक अकाउंट डिटेल्स

सेक्शन 80C,80D मिळणाऱ्या सूटचे प्रमाणपत्र, घराच्या भाड्याची माहिती, एलआयसी प्रीमियमची माहिती तुमच्याजवळ असायला हवी.

ITR Filling
ITR Filling 2025: आयटीआर फाइल करण्याची योग्य वेळ कोणती? या तारखेनंतरच भरा; अन्यथा रिफंड येण्यास येतील अडचणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com