ITR Filling 2025: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आता ३० नोव्हेंबरपर्यंत जमा होणार रिफंड

ITR Filling 2025 Rule: आयटीआर फाइल केलेल्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आयटीआर फाइल करुनही रिफंड आला नसेल तर तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापर्यंत येणार आहे.
ITR Filling 2025
ITR Filling 2025Saam Tv
Published On

आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. करदात्यांनी आयटीआर फाइल करण्यास सुरुवातदेखील केली आहे. दरम्यान, आता आयटीआर फाइल केलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयटीआर भरल्यानंतर तो स्विकारल्याचा मेसेज आला नसेल तर आता ही सेटलमेंट लवकर करण्यास सांगितले आहेत.

इन्कम टॅक्स विभागाने यासाठी निर्देश दिले आहेत. जर कोणत्याही करदात्यांना २०२२-२३ मध्ये आयटीआर फाइल केले होते. परंतु काही कारणांनी टॅक्स रिटर्न झाले नाही किंवा जुने रिफंड बाकी आहे तर या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत दिले जाणार आहेत.

ITR Filling 2025
ITR Filling: आयटीआर कसा फाइल करावा? ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

आर्थिक वर्ष २०२२-२३ म्हणजेच असेसमेंट वर्ष २०२३-२४साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहेत आणि रिफंट मिळाला नाही तर तुम्हाला लवकरच हे पैसे मिळणार आहेत. आयकर विभागाने ९ जून २०२५ रोजी हे आदेश जारी केले होते. ज्यामध्ये आयटीआर वेळेवर भरले आहेत परंतु त्याची सेटलमेंट अजून झाली नाही तर ती ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत होणार आहे.

करदात्यांना दिलासा

आयकर विभागाने हा निर्णय घेऊन करदात्यांना दिलासा दिला आहे. ज्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत आयटीआर फाइल केला आहे आणि रिफंड मिळाला नाही आणि त्यांना याबाबत कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही त्यांना आता दिलासा दिला आहे. इन्कम टॅक्स कायदा १९६१ नुसार, कोणत्याही आर्थिक वर्षात आयटीआर प्रोसेस करण्यासाठी ९ महिन्याच्या कालावधीची सीमा असते. परंतु अजूनही जर तुम्हाला रिफंड आला नसेल तर तो तुम्हाला लवकरच मिळणार आहे.

ITR Filling 2025
Income Tax Return बाबत महत्त्वाची अपडेट; आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, नवी तारीख काय? वाचा सविस्तर

आयटीआर फाइल केल्यानंतरही काही तांत्रिक कारणांनी प्रोसेस करु शकले नाही. त्यांना आता आयकर विभागाने सूट देईन आयकर रिटर्न ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रोसेस करण्यासाठी किंवा त्यासंबंधित सूचना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

ITR Filling 2025
ITR Filling: उशिरा आयटीआर फाइल केल्यास किती दंड भरावा लागतो? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com