बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या जोड्या सुपरहिट ठरतात. या कलाकारांमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेता परेश रावल यांच्या जोडीचे नाव अनेकवेळा घेतले जाते. या दोघांनी 'फिर हेरा फेरी' 'भुल भुलैया' 'ओएमजी: ओह माय गॉड' अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा 'ओएमजी: ओह माय गॉड' हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २०१२चा सर्वात जास्त कमाई करणारा आणि यशस्वी चित्रपट ठरला होता.
'ओएमजी: ओह माय गॉड' या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने श्रीकृष्णाची तर परेश रावल यांनी एका वकिलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. २०१२मध्ये 'ओएमजी: ओह माय गॉड' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. परंतु चित्रपटाबद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्यांची कल्पना अद्यापही प्रेक्षकांना नाही.
चित्रपटामध्ये अभिनता अक्षय कुमार यांची ग्रँड एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्यांच्या एन्ट्रीला ज्या बाईकचा वापर केला होता त्या बाईकला १० हजार रुपये खर्च करुन मॉडिफाय करण्यात आली होती. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाल्यावर देशातील अनेक भागांमध्ये चित्रपटाबद्दल निषेद व्यक्त करण्यात आला होता त्यासोबतच कलाकारांना ट्रॉलही केले जात होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्र काहीसं वेगळ पाहायला मिळालं होतं. प्रेक्षकांकडून चित्रपटामधील काही सीन्स बदल्याची मागणी देखील करण्यात आली होती. 'ओएमजी: ओह माय गॉड' या चित्रपटाचे मुख्य कलाकार परेश राव आणि अक्षय कुमार यांना काही काळासाठी पोलिस संरक्षण देण्यात आले होते. २०२०मध्ये अक्षय कुमारकडून चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर २०२२मध्ये 'ओएमजी: ओह माय गॉड २' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला.
'ओएमजी: ओह माय गॉड' हा चित्रपट २७ सप्टेंबर २०१२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. त्यासोबतच या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, परेश रावल, अश्विनी यार्दी, भूपेंद्र कुमार मोदी आणि विक्रम मल्होत्रा यांनी केली होती. या चित्रपटामध्ये अभिनेता परेश रावल आणि अक्षय कुमार यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. 'ओएमजी: ओह माय गॉड' या चित्रपटामध्ये अक्षय यांची साथ बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव, ओम पुरी या कलाकारांनी दिली होती. या चित्रपटाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर हा चित्रपट आधारित आहे.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.