
मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर आमदारांसोबत स्नेहभोजन केल.
त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या मंत्र्यांसोबत बैठक सुरू
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात बैठक.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी मुद्यावर एकत्र आल्यानंतरची भाजप मंत्र्यांची पहिली बैठक सुरू
इगतपुरी
- धामडकी वाडी येथे दरड कोसळली
- सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने माती आणि दगडांचा ढीग आला रस्त्यावर
- भावली धरणजवळ असलेल्या धामडकीवाडी येथील रस्ता बंद
- धामडकीवाडीसहित आजुबाजूच्या आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला
राज्यसह विदर्भात सध्या दमदार पाऊस सुरू आहे, तर पुढील २४ तासांत अमरावती येथे काही ठिकाणी मुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्त सोम्या शर्मा यांनी केल आहे... तर लोकांना मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर देखील जारी केला आहे.... हेल्पलाइन नंबर
📞 संपर्क करा: 0721-2576426
ती बोट नसून फलोटींग बोया असल्याचे स्पष्ट
पाकीस्तानातून भारतीय समुद्रात वाहून आला बोया
सुरक्षा यंत्रणांनी सोडला सुटकेचा निःश्वास
तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत
ठाकरे गट मनसे आणि शिवसेना शिंदे गटात जुंपली
अर्धवट पुलाचे उदघाटन करणाऱ्या आणि पुलाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा ..ठाकरे गटाची मागणी
"पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे..भीतीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केलं ..सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत ते खाल्ल्या मिठाला जागतायत ..मनसे नेते राजू पाटील यांची टीका
पलावा पुलावर तीन दिवसात एकही अपघात नाही ,
विरोधकांना काय टीका करायचे ते करून देत आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार - शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर त्याचबरोबर अक्कलपाडा धरनामध्ये वाढ झालेल्या पाणी पातळीनंतर पांझरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, यंदाच्या हंगामात पांझरा नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत आहे,
धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे बचाव पथक व शासकीय यंत्रणादेखील सज्ज झाल्या आहेत, फरशी पुलावरून कुणीही प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे, त्याचबरोबर फरशी पुलावर आणि पुलाच्या दोन्ही बाजूला आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तैनात करण्यात आले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आज अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, खासदार निलेश लंके, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षच्या सौ सुषमा अंधारे, सांगोलाचे आमदार बाबासाहेब देशमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या PNP नाट्यगृहाचे उदघाटन करण्यात आले. 2017 साली PNP नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती मात्र दोन वर्ष पूर्वी या नाट्यगृहाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. सहकार क्षेत्रातून साकरण्यात आलेले हे पहिले नाट्यगृह असून त्याची पुन्हा नव्याने उभारणी करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुन्हा या नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले.
अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसर मध्ये बॉम्ब असल्याच्या बातमीने उडाली खळबळ
एका अज्ञात इसमाने पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून सरोज टॉकीज परिसरामध्ये बॉम्ब असल्याचा केला होता फोन
घटनास्थळी बॉम्ब शोध पथकाने शोध मोहीम सुरू केली मात्र त्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही
घटनास्थळी एसिपी, सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक व श्वानपथकाने केली पाहणी
सरोज टॉकीज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
पोलीस दलातील कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्या नंतर पोलीस दल हादरले
स्वरूप जाधव असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे
पुण्यातील राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या
पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात सध्या याबाबत तपास सुरू आहे
पुण्यातील स्वारगेट येथील पोलीस लाईन मध्ये असलेल्या घरात गळफास लावून केली आत्महत्या
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही
मीरा-भाईंदर शहरामध्ये मराठी व अमराठी वाद निर्माण झाल्यानंतर राज्यासह देशात याचे पडसाद पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात उद्या मीरा-भाईंदर मध्ये मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चाच्या भीतीपोटी व्यापाऱ्यांनी लेखी पत्र देऊन पोलिसांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मंगळवारी निघणाऱ्या मोर्चाला मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पाबंदी घालण्यात आली आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांनी प्रवेशबंदी घातली आहे.
- नाशिक मध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ
- मारुतीच्या कमरेच्या वर गोदावरीच्या पुराचे पाणी
- गंगापूर धरणातून करण्यात येतोय 6336 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
- रामकुंड मृदा घाटाला गोदावरीच्या पुराचा वेढा कायम
नाशिकरोड परिसरातील पवारवाडी, भारत भूषण सोसायटी येथे चड्डी गँगणणे तीन ते चार ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल
पेट्रोल चोरी करत असताना गाड्यांवर बसून सिगरेट पेटवली आणि काही काळातच गाड्यांनी घेतला पेट
पुण्यातील रामवाडी परिसरात मध्यरात्री एकच्या सुमारास घडली घटना
चंदननगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
प्रथमेश बाजीराव पाटील असे 20 वर्षीय तरुणाचे नाव
तरुणावर कलम 326 (अ) आग लावणे व पेट्रोल चोरी कलम 303 प्रमाणे गुन्हा करण्यात आला दाखल
आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना उबाठा चे पुण्यात आंदोलन
छत्रपती संभाजी राजे व छत्रपती शिवराय यांच्या बद्दल असभ्य शब्दांचा वापर करून प्रतिक्रिया दिली होती
पुण्यात शिवसैनिकांकडून छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन
निशिकांत दुबे विरोधात सुद्धा शिवसेना उबाठा चे शिवसैनिकांचे आंदोलन
संपूर्ण राज्यात शिवभक्तांच्या भावना दुखावून वाद
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे
चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट
तिन्हीही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
हातात बांबू घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आव्हान दिलं आहे. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, हा फक्त बांबू नाही याआधी देखील हातोड्याचा वापर केला आहे. मारण्याची भाषा कोणी करत असेल तर उद्धव साहेब राज साहेब यांच्याकडे जाण्याआधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावर या. मातोश्री आणि शिवतीर्थ लांबच राहिलं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे या मग आम्हाला जे करायचं आहे ते सांगतो असं आवाहन वसंत मोरे यांनी दिलं आहे.
यवतमाळ शहरात भूमिगत गटार योजनेची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात या गटार योजनांच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.शहरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये भूमिगत गटार योजनेचे कामे करण्यात आली असून प्रशासनाकडून या परिसरातील रस्त्यांवर गोटे-माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केली, मात्र पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. या विरोधात यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे यांच्या दालनात ठिया आंदोलन करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपुर येथे नेण्यासाठी तब्बल 7 किलोमीटरचे अंतर झोळी करून आणि पायपीट करत पार करावे लागले. रस्ता नसल्यामुळे आणि कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
पावसाळ्याच्या तोंडावर दुर्गम भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका तर दूरच, दुचाकीचीही ने-आण शक्य होत नाही. त्यामुळे आपत्कालीन वेळी ग्रामस्थ, महिलावर्ग आणि आशा कार्यकर्त्यांना मिळून रुग्ण झोळीत ठेवून पायवाटेने रुग्णालय गाठावे लागले.
17 जून रोजी सांगली येथे हिंदू जन आक्रोश मोर्चात आ. गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरू बद्दल अवमान जनक वक्तव्य केलं होत. याच्या विरोधात आज बुलढाण्यातील खामगाव येथील ख्रिस्ती बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिल. यात मागणी केली आहे की, कारण नसताना ख्रिस्ती धर्मगुरू बद्दल अवमान जनक वक्तव्य केल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा. या निवेदनावर शेकडो ख्रिस्ती बांधवांच्या सह्या आहेत.
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातून धक्कादायक घटना समोर
- उळेगावात राहणाऱ्या नवऱ्याने चार्जिंगचा वायरने गळा आवळत केला बायकोचा खून घटनेनंतर स्वतःनेही घेतला गळफास
- गोपाळ लक्ष्मण गुंड वय - 30 आणि गायत्री गोपाळ गुंड वय - 22 अशा दोघा पती-पत्नींची नावे
- दोनच महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या जोडप्याच्या बाबतीत दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ
पंढरपूरला आषाढी वारीसाठी गेलेले वारकरी आता परतीच्या प्रवासाला निघाले असुन या वारकऱ्यांसाठी धाराशिव च्या कळंब शहरात अन्नछत्र उभारण्यात आल आहे.वारीला जाताना अनेक ठिकाणी वारकऱ्यांना जेवनाची सोय केली जाते माञ परतणाऱ्या वारकऱ्यांची देखील सोय व्हावी यासाठी गेल्या सहा वर्षापासून स्व.गणपतरावजी कथले आघाडीच्या अन्नछत्र उभारण्यात येत आहे.धाराशिव च्या कळंब मार्गे हजारो वारकरी पंढरपूरला जात असतात या वारकऱ्यांची आपल्या गावी परतत असतानाही देखील सोय व्हावी यासाठी आज दिवसभर कळंबकरांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच विजयी मेळाव्याबाबत आनंद व्यक्त केला. 'आम्ही एकत्र आल्यानं माध्यमांना आनंद झाला. विजयी मेळावा हा मराठी माणसाठी आनंदाचा क्षण होता. महाराष्ट्र, मराठी माणसासाठी सर्व ते करणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली,' मेळाव्यामुळे भाजपला मिरच्या झोंबणं साहजिकच. मुळ भाजपची हत्या केली आहे. भाजप लोकांची घरं फोडून राजकारण करत आहे', असा घणाघात ठाकरेंनी केला.
काँग्रेसचे भक्कम नेतृत्व असलेले माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर धुळ्यात आता काँग्रेसची पुन्हा एकदा मोर्चे बांधणी सुरू
माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा राज्य प्रवक्ते सचिन सावंत व खासदार शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची आढावा बैठक
आढावा बैठकीमध्ये काँग्रेसचा धुळे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यासाठी ही बैठक पडली पार
कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धुळ्यात काँग्रेसची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न...
राज्यातील अंशतः विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा मंजूर झाला असतानाही जाणीवपूर्वक ते अनुदान शासन देत नसल्याचा आरोप करीत उद्यापासून राज्यातील अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटना आणि संस्थाचालक संघटना शाळा बंद ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे, त्या परिपत्रकाला आम्ही केराची टोपी दाखवत आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या आझाद मैदानात आंदोलनासाठी सगळे जमायचे आहे शासनाला काय कारवाई करायचे ते करू दे अशी भूमिका शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी राजे तसेच महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळलीय.नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.नांदेड शहरतील आयटीआय चौकात हे आंदोलन करण्यात आले.
"दुबे महाराष्ट्रात आल्यावर नक्की त्यांना भेटू"
"दुबे यांची भेट घेऊन त्यांची नक्की मुलाखत घेऊ"
दोन नेत्यांचं एकत्र येणं भाजप नेत्यांना झोंबतय
उद्धव साहेब राज साहेब एकत्र आले आणि बाहेरची पिलावळ वळवळ करायला लागली
दुबे कितीवेळा महाराष्ट्रात आणि मुंबईत आले
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
१५ लाख रुपयांचे अफिम तर ११ लाख रुपयांचे एम डी पोलिसांनी केले जप्त
पुण्यातील कोंढवा भागातून १५ लाख तर बिबवेवाडी मधून ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त
याप्रकरणी २ जणांना पोलिसांनी अटक केली आहे
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज... छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोड्यावर मावळा बसवून शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाड यांच्या पोस्टरला घोड्याच्या टापा खाली तुडवण्यात आलं.
कळंब पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप
मयत भैरु चौधरी हे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेल्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी कळंब येथील शिवाजी महाराज चौकातून 4 जुलै रोजी मारहाण केल्याचा नातेवाईकाचा आरोप
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी साडेअकरा वाजता नेहूण मारहाण केल्यानंतर पहाटे साडेपाचला परत आणून सोडल्याची नातेवाईकांचा आरोप
लातुर जिल्ह्यातील मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना भैरु चौधरीचा झाला मृत्यू
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे गावात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला दिला पाठिंबा
प्रशासनाकडून शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची यशस्वी मोजणी सुरू
अनेक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला दिली संमती
महसूल प्रशासनाचे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात सकाळीच मोजणीसाठी दाखल
हिंजवडी आयटी पार्क नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आयटी पार्क हिंजवडी मध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक नियंत्रणावर प्रश्न उपस्थित राहिला आहे.फेज 2 आणि फेज 3 च्या रस्त्यावरती मोठा चक्काजाम झाला आहे. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना आयटीआय अभियंत्यांना करावा लागत असल्याने. आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांना या होणाऱ्या ट्रॅफिकचा मोठा सामना करावा लागत आहे.
घाटकोपर पूर्व येथील पालिकेच्या टिळक मार्ग मनपा शाळेत पालक, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्त आंदोलन करण्याच्या तयारीत
ही शाळा बंद करून दोन किमी लांब शाळेत विद्यार्थी पाठविण्याचा प्रशासनाचा निर्णय
या विरोधात पालक आणि पक्षाचे कार्यकर्ते शाळेसमोर एकत्र येण्यास सुरुवात
सांगली जिल्ह्यात सततचा पडणार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कृष्णेच्या पाणी पातळी ही साडे 18 फुटावर गेली आहे. तर कृष्णा आणि वारणा नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे वारणेच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज परभणी दौऱ्यावर आहेत त्यांचा परभणीतील सावली विश्रामगृहात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला यानंतर ते माध्यमांशी बोलले ज्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती राहणार की भाजप स्वतंत्र लढणार यावर वरिष्ठ निर्णय घेतील मात्र आम्ही संघटनात्मक बांधणी चांगली केली असल्याचे म्हटले आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढच्या महिन्यात राज्यात विभागवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे सांगितले आहे
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवेमध्ये एका मेट्रोमध्ये सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मेट्रोची सेवा रद्द करण्यात आली होती त्यामुळे २० मिनिटे मेट्रो सेवा ठप्प झाली होती त्याचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला मोठी गर्दी पाहायला मिळाली यानंतर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करून मेट्रो सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली परंतु कामावर जाण्याच्या वेळी मेट्रो सेवा रखडल्यामुळे प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला.
बीड -
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरुवात विशेष सरकारी वकील उज्वल निकम न्यायालयात दाखल.
आरोपी वाल्मीकरांच्या दोष मुक्तीच्या अर्जावरती रिप्लाय गोमट होणार.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची नववी सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात होत आहे.
सकाळी 11 वाजेपासून गंगापूर धरणातून 6,336 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा विसर्ग वाढवला
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नाशिक मध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होणार
रामकुंड भागात असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या दुकानात पाणी शिरण्यास सुरुवात
दुकान आणि टपऱ्या बाजूला काढण्यास सुरुवात
संभाजीनगरमध्ये जलील यांच्या घरी झाली पहिली बैठक
स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणूकामध्ये दलित मुस्लिम मतांची बांधण्याचा प्रयत्न
चंद्रशेखर आजाद (रावण ) यांच्या आझाद समाज पार्टी सोबत झाली बैठक
आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रभारी गौरी प्रसाद उपास आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये बैठ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात, जय भारत" या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः मराठी अस्मितेवरून ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात मराठी भाषेच्या अवमानावरून शिंदे यांच्यावर जोरदार टीका झाली.मात्र दुसरीकडे, शिंदे गट मात्र आपली राजकीय गणितं नव्याने आखताना दिसतो आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शहाड परिसरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात काँग्रेसला मोठा झटका देत उत्तर भारतीय समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत सामील करून घेतले.
विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे...
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील अमरावती अशा एकूण 7 जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे..
तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केले आहे...
जून महिन्यात विदर्भातील फक्त बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती.. मात्र जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे..
हिंजवडी आयटी पार्क परिसरात मोठा इलेक्ट्रिक पावर ऑफ कालपासून झाला आहे. मेगा पोलीस सोसायटी जवळील महापारेषण च्या अतिउच्च दाब लाईनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हिंजवडी परिसरात मागील 18 पासून मोठा इलेक्ट्रिक पावर ऑफ झाला आहे.
मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी होत आहे
तसेच पर्यटक प्रवासी मुंबईच्या दिशेने आज सोमवार असल्यामुळे
तसेच पावसाळी अधिवेशन असल्यामुळे त्यामुळे अधिकारी मंत्रालयाच्या दिशेने जाण्यासाठी
वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो
फ्री वे जाम
एक ते दोन किलोमीटरच्या रांगाच रांगा
नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे आणि यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सातपुड्यात दाखल झाले आहेत. मात्र, या आनंदात काही प्रमाणात धोकाही दिसून येत आहे. अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करत आहेत. विशेषत काही उत्साही पर्यटक जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून "ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी"ने शिर्डीसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला शहादा येथे अटक झाली असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून ओसरला आहे. यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळी 1 फुटाणे उतरलेली आहे. पंचगंगा नदीची पातळी 31फूट 6 इंच झालेली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली आहेत. मात्र धरण क्षेत्रात तुरळ पावसाच्या सरी पडत आहेत.
मारहाणीत भाविक रक्तबंबाळ...
गोपाळपूर रोडवरील पत्राशेड येथील दर्शन बारीतील आज सकाळची घटना...
नागपूर येथील भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर केली काठीने मारहाण...
भाविकाला झालेल्या मारहाणीचा भाविकांमधून तीव्र संताप,
कारवाईची मागणी ...
नवी मुंबई पोलिसांचे दुर्लक्ष
नवी मुंबई शहरामध्ये पोलिसांकडून कमी प्रमाणात पेट्रोलिंग करत असल्यामुळे त्यामुळे चोरांचा प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ
नेरूळ येथील सेक्टर चार मध्ये चोरांच्या सुळसुळाट
वाशिमच्या मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आता नवीन संकट कोसळलं आहे. रोही या वन्य प्राण्यांचे मोठे कळप शेतांमध्ये शिरत असून, सोयाबीन, तूर, आणि कापसासारख्या पिकांचं मोठं नुकसान करत आहेत. एका कळपात ४० ते ५० रोही असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्राणी शेतात घुसून उगवती पिकं फस्त करत आहेत, तुडवत आहेत आणि काही शेतांमध्ये तर पूर्ण पीक नष्ट झाल्याचं चित्र असून शेतकरी हवालदिल झालेत.शेतकऱ्यांकडून वन विभागाकडे या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे
वर्सोवा अंधेरी मेट्रोल तांत्रिक बिघाडा मुळे उशिराने धावत आहे .. त्यामुळे असंख्य प्रवासी घाटकोपर स्थानका मधे अडकले आहेत … -
धाराशिव जिल्ह्यात पावसाने गेली 22 दिवसापासून अपवाद वगळता मोठा ब्रेक दिला असुन त्यामुळे जिल्ह्यातील १० टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत.जिल्ह्यात ९० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत माञ उर्वरित पेरण्यासाठी आता पावसाची प्रतिक्षा आहे.जुनच्या पहील्या आठवड्यानंतर पावसाने ओढ दिली आहे.मागील तीन चार दिवसांपुर्वी पावसाचे वातावरण तयार झाले माञ अपवाद वगळता जिल्ह्यात पाऊस झालेला नाही.त्यामुळे सुरूवातीला मोठी आघाडी घेतलेल्या पेरण्यांना मोठा ब्रेक लागला आहे. जिल्ह्याच खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ५४ हजार १६० हेक्टर आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असुन शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे.
सकाळी खडकवासला धरणातून ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला वरसगाव पानशेत आणि टेमघर या चार धरणात एकूण ६६ टक्के पाणीसाठा
गेल्या वर्षी च्या तुलनेत तीन पट पाण्यासाठी जास्त
सकाळपासून पुणे शहरात काही ठिकाणी पाऊस सुरू
नागपुरात सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती मात्र आज सकाळपासून सुरू झालेला
तेच पुढील 48 तासापर्यंत हवामान विभागाकडून विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे...
रिमझिम हलका स्वरूपाचा सुरू असलेला पाऊस हा शेतीसाठी उपयोगी असा पाऊस आहे..
पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आला आहे
वाशिम शहरातील पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. सततच्या पावसामुळे परिसरात चिखल आणि डबक्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. या दयनीय स्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
चिखली जवळ महाबीज कार्यालयासमोर एस टी बस दुभाजकावर आढळून झाली पलटी. .,
हा अपघात आज सकाळी रात्री 2 वाजताच्या सुमारास झाला..
अपघातात जवळपास 30 प्रवाशी भाविक जखमी ..
जखमीवर चिखली आणि बुलढाणा रुग्णालयात उपचार सुरू ..
बस पंढरपूर वरून खामगाव जात होती ..
बसमध्ये 51 भाविक प्रवास करत होते.
पंढरपूर सोहळा आटोपून भाविक घरी जात असताना घडली घटना ..
नागपुरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे..
हवामान विभागाने आज नागपूर सह पूर्व विदर्भातील सर्व सहा जिल्ह्यात तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे..
पूर्व विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण असून आज दमदार पावसाची अपेक्षा आहे..
- धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातील अनेक भागात मागील २ दिवसांपासून जोरदार पाऊस
- गंगापूर धरणातून ५,१८६ क्यूसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
- नाशिकमध्ये गोदावरीची पूरपरिस्थिती कायम, दुतोंड्या मारुतीच्या बेंबीपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी
- रामकुंड, गोदा घाटावरील अनेक मंदिरं पुराच्या पाण्याखाली तर अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा
- पुढील २ ते ३ दिवस नाशिकला पावसाचा अलर्ट, पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग आणखी वाढवणार
- नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
,मावळच्या घाट माथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पवना धरणात सध्या 76.22% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचे प्रमाण व धरणातील साठा याचा समतोल राखण्यासाठी धरना मधून 2800 क्लूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र घाट माथ्यावरील पावसाचे प्रमाण व धरणात येत असलेल्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता धरणाच्या सांडव्यावरून पाणी कमी जास्त करण्यात येणार आहे...
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यात इतिहासात प्रथमच बोटिंगच्या स्पर्धा भरवण्यात आल्या. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून या स्पर्धा घेण्यात आले आहेत. तलावामध्ये या राज्यस्तरीय कयाकिंग बोटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होते. तर आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले आहे. या स्पर्धा दुष्काळ भागात प्रथमच पाहण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे,अश्या जहरी शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.2019 मध्ये जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचे बहुमत दिलेला असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत अनैसर्गिक युती करत सूर्याजी पिसाळाचे काम केले होते,आता मातोश्रीवर व उध्दव ठाकरेंना भेटायला कोण जात नाही,त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडला असून ते वैफल्यग्रस्त बनले आहेत,अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनाजीपंत म्हणून केलेल्या टिकेवरून हा निशाणा साधला आहे,ते सांगलीच्या जत मध्ये होते.
- येत्या 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट.... सकाळ पासूनच रिमझिम पावसाला सुरवात..
- पूर्व विदर्भात दोन ढगाळ वातावरण राहिलेले ढग मुसळधार बरसण्याची शक्यता आहे
- आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात अत्याधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे
- तर उद्या नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे
- नागपूर, वर्धा,भंडारा, गडचिरोली मध्ये रविवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे
डोंगरगाव वरचीवाडी येथे चावडीजवळच्या पडीक शेतात अकरा किलो वजनाचा व दहा फुट लांबी असलेला अजगर ग्रामस्थांना आढळला ग्रामस्थांनी सर्पमित्र मंगेश पटेकर यांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्र मंगेश पटेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने या अजगरास पकडून त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळेस माजी उपसरपंच रामदास पडवळ ग्रामस्थ शंकर शेजवळ् सोपान पडवळ ज्ञानेश्वर भांगरे रामभाऊ शेजवळ नारायन निबुदे दिनकर भांगरे ज्ञानेश्वर पडवळ लक्ष्मण लायगुडे विश्वनाथ पडवळ ज्ञानेश्वर जाधव अविनाश निबुदे उपस्थित होते.
पालघर - पालघर मधील धनसार येथील एमआयडीसीतील कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग . प्लॅटिनम पॉलिमर्स या कंपनीला मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास भीषण आग. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल . आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज .
पालघर _ सतत दोन दिवस बरसणाऱ्या पावसाने रात्रीपासून उसंत घेतल्याचं दिसत आहे.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या आणि वैतारणा नदी पात्रामध्ये पाण्याची वाढ झालेली आहे. प्रशासना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर आजही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी यांना जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असा आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
एसटीच बंद आगराला लागली आग
मात्र आगारात मोठ्याप्रमाणात ट्रक आणि कारची पार्किंग असल्याने वाहनांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे
वाशी नेरूळ आणि ऐरोली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आगाराच्या आगीत स्फोट होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पद्मश्री अशोक सराफ हे मराठी क्षेत्रातील कोहिनुर हिरा असून ते मराठी कला सृष्टीतील विद्यापीठ आहे. अशोक सराफ आणि अक्षराचे जादुगार अच्युत पालव या दोघांनी महाराष्ट्रची मान उंचावली आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेच्या वतीने कला सेवकांचा नागरी सन्मान सोहळा कार्यक्रम अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्यपरिषद कार्यकारणी सदस्य विजय चौगुले यांनी आयोजित केला होता. यावेळी महाराष्ट्र भूषण सिने अभिनेते अशोक सराफ व सुलेखनकार अच्युत पालव यांचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारने गौरविल्याबददल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले.
अवघ्या 15 ते 20 दिवसांचं बिबट्याचं पिल्लू लांजा-पुनस-रत्नागिरी मार्गावर पुनस येथे 4 जून रोजी सापडलं होतं. त्यानंतर जंगलमय भागात बिबट्याच्या पिल्लाला आईबरोबर पुनर्भेटीसाठी ठेवण्यात आलं होतं. परंतु, पिल्लाची आईशी भेट झाली नाही. त्यानंतर पिल्लाला लांजा वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. या पिल्लाची आईशी भेट न झाल्याने तब्बल 25 दिवसानंतर 2 जुलै रोजी मुंबई-बोरिवली येथील संजय गांधी उद्यानात पाठवण्यात आलं आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पावसमध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. रत्नागिरीच्या दिशेने जाणा-या एका ओमनी गाडीने अचानक पेट घेतला. पावसमधील रस्त्यावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, ही गाडी मेर्वी गावातील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.