Chandu Champion Box Office Collection Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Chandu Champion Collection : साताऱ्याच्या मुरलीकांत पेटकर यांचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना भावला, 'चंदू चँपियन'ची तिकीटबारीवर यशस्वी घोडदौड

Chandu Champion Day 4 Box Office Collection : कार्तिक आर्यन स्टारर बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'चंदू चँपियन' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी आपल्या कमाईचा आलेख चढताच ठेवलेला आहे.

Chetan Bodke

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'चंदू चँपियन' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. 'चंदू चँपियन'ची निर्मिती आणि दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या मुरलीकांत पेटकर या जिगरबाज माणसाची भूमिका अभिनेता कार्तिक आर्यनने साकारली आहे. भारताला पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांचा प्रेरणादायी प्रवास आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झालेले आहेत. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल...

१४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या 'चंदू चँपियन' चित्रपटाने आतापर्यंत २६.२५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.७५ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी ७ कोटी, तिसऱ्या दिवशी ९.७५ कोटी, तर चौथ्या दिवशी ४.७५ कोटींची कमाई केलेली आहे. फक्त देशातच नाही तर परदेशातही चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाला विकेंडचा फायदा झालेला आहे. चित्रपटाचं बजेट १२० कोटी रुपये इतकी आहे. निर्मितीचा खर्च वसूल करण्यासाठी निर्मात्यांना खूपच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

बायोपिकमध्ये, मुरलीकांत पेटकर यांचा एक सैनिक आणि बॉक्सर होण्यापासून ते गंभीर दुखापतीतून बरा झाल्यानंतर जलतरणपटू होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास दाखवण्यात आला आहे. मुरलीकांत पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करीत असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT