Maval News : आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत पुण्याचा डंका; तृप्ती निंबळेने पटकाविले सुवर्णपदक

आत्तापर्यंत तृप्तीने तब्बल 69 पदके मिळविले आहे.
boxer trupti nimble bagged gold in international thai boxing competition
boxer trupti nimble bagged gold in international thai boxing competitionsaam tv
Published On

Maval News :

मावळ तालुक्यातील वारु गावातील कन्या तृप्ती शामराव निंबळे हिने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक (boxer trupti nimble bagged gold in international thai boxing competition) पटकावले. तिच्या या यशाबद्दल पंचक्राेशीत जल्लाेष करण्यात आला. (Maharashtra News)

यापूर्वी तृप्तीने विविध देशामध्ये जाऊन थायबाँक्सिंग स्पर्धांत सुवर्णपदके मिळवली आहेत. तिने सन 2018 कालावधीत पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर, मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता.

boxer trupti nimble bagged gold in international thai boxing competition
Protest against Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांचा निषेध... 'शरद पवार गटाचा पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही' (पाहा व्हिडिओ)

याबराेबरच भुतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. आसाम येथील स्पर्धेत रजतपदक. गोवा राज्यात झालेल्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले. आत्तापर्यंत तिने तब्बल 69 पदके मिळविले आहे.

नेपाळ येथून परतल्यानंतर तृप्तीचे गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. थायबॉक्सिंग क्रीडा प्रकारात तृप्तीने उंच भरारी घेतली आहे. तृप्तीला खेळाचे बाळकडू हे तिला घरातुनच मिळाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वडिल शाम निंबळे पुणे जिल्हात कुस्ती क्षेत्रातील मल्लसम्राट आहेत. तृप्तीमुळे संपूर्ण मावळचे आणि देशाचे नाव लौकिक वाढल्याची भावना तिच्या कुटुंबियांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

boxer trupti nimble bagged gold in international thai boxing competition
SSC-HSC Exam: ...अन्यथा दहावी- बारावीची परीक्षा होणार नाही; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com