Varun Dhawan Bhediya Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhediya Box Office Collection: 'भेडिया'ला भारतासह जगभरात प्रेक्षकांची पसंदी, चित्रपटाची कमाई दिलासादायक

वरुण धवन आणि क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत असलेल्या 'भेडिया' चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bhediya Box Office Collection: वरुण धवन आणि क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत असलेल्या 'भेडिया' चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. परंतु चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडला सरासरीपेक्षा जास्त कमाई केली आहे. रविवारी या चित्रपटाने 11.50 कोटींची कमाई केली असून, चित्रपटाची एकूण कमाई 28.55 कोटींवर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे अजय देवगणच्या 'दृश्यम 2'ने वरुण धवनच्या 'भेडिया'ला बऱ्यापैकी टक्कर दिली आहे. होय, 'दृश्यम 2' 10व्या दिवशी 'भेडिया'च्या जवळपास दुप्पट कमाई करत आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

तथापि 'भेडिया'ने पहिल्या आठवड्यात आपल्या कमाईचा आलेख चढता कायम ठेवला आहे. चित्रपटाने शुक्रवारी 7.48 कोटी, शनिवारी 9.57 कोटी तर रविवारी 11.50 कोटींची कमाई केली. आता या आठवड्यात चित्रपट आपली किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'भेडिया' चित्रपटाचा निर्मितीचा खर्च 60-65 कोटींपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटाला हिट होण्यासाठी 100 कोटींपर्यंत कमाई करावी लागेल हे नक्की. सध्या हा आकडा जरा अवघड वाटत असला तरी चित्रपट आपला बजेट ओलांडून सरासरीच्या श्रेणीत येईल अशी अपेक्षा आहे.

या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.06 कोटी, दुसऱ्या दिवशी 14.60 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 17.01 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची जगभरातील बॉक्स ऑफिसवरील कमाई 43.67 कोटींवर पोहोचली आहे.

अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला 'दृश्यम 2'ने बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली. दहाव्या दिवशीही या चित्रपटाने जवळपास 20 कोटींची कमाई केली आहे. याचा परिणाम 'भेडिया' चित्रपटालाही बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाची एकूण कमाई जेमतेम 60- 70 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर चांगली गगनझेप नाही घेऊ शकला तरी, फ्लॉप न होण्याची शक्यता बरीच आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'भेडिया' चित्रपट प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत आवडत असल्याची ही पोचपावती म्हणावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्हाला डावलण्यात येत आहे; वरूण सरदेसाई

Pune University Protest: पुणे विद्यापीठात आंदोलन; पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड,VIDEO

Flight Ticket: सलग सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला, तिकीटासाठी दुप्पट खर्च; गोवा- चेन्नईसाठी किती पैसे मोजावे लागणार?

मुंबईत मराठी - गुजराती वाद, परप्रांतियाकडून मराठी तरूणाला मारहाण; VIDEO व्हायरल

Ahaan Panday-Aneet Padda: सैयारा नंतर अहान पांडे आणि अनित पड्डाच्या डेटिंगला सुरुवात? इंटरनेटवर रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT