Monalisa Photo: मोनालिसाच्या अदांवर चाहते फिदा, टाईट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केली फिगर फ्लॉन्ट

Monalisa Photo: मोनालिसाच्या अदांवर चाहते फिदा, टाईट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केली फिगर फ्लॉन्ट

मोनालिसा दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होत आहे. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Published on

Monalisa Viral Photo: भोजपुरी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा तिच्या लूकमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्रीची स्टाईल पाहून नक्कीच असं म्हणता येईल की, मोनालिसा दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होत आहे. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पुन्हा तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

Monalisa Photo: मोनालिसाच्या अदांवर चाहते फिदा, टाईट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केली फिगर फ्लॉन्ट
Arun Gawali: डॅडींची अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरीला नोटीस; वाचा सविस्तर कारण

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचा नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक लेदर प्रिंट स्किन फिट शॉर्ट ट्यूब ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये मोनालिसा तिची फिगर फ्लॉंट करत आहे. तिने कॅमेऱ्यासमोर अनेक पोज दिल्या आहेत. (Social Media)

मोनालिसाने न्यूड रेड शेड मेकअपसह तिचा लुक पूर्ण केला आहे. तसेच तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच सुंदर आणि अत्यंत हॉट दिसत आहे.

मोनालिसाचा हा नवा लूक चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे कौतुक करताना लोक खूप कमेंट करत आहेत. मोनालिसा सध्या तिच्या आगामी वेबसीरीज 'रात्री के यात्री 2' मुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजमध्ये मोनालिसासोबत रश्मी देसाईही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही अभिनेत्रींचे चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (Web Series)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com