Bad Newz Poster Instagram
मनोरंजन बातम्या

विकी कौशलसाठी Bad Newz ठरला Good News देणारा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई

Bad Newz 3rd Day Collection : आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज' चित्रपट थिएटरमध्ये, १९ जुलैला रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून चित्रपटाला पहिल्या विकेंडला दमदार प्रतिसाद मिळालेला आहे.

Chetan Bodke

विकी कौशल, एमी विर्क आणि तृप्ती डिमरी स्टारर 'बॅड न्यूज' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्य बाब म्हणजे, ‘बॅड न्यूज’ चित्रपट हा विकी कौशलच्या कारकिर्दितील हिट चित्रपटांपैकी एक आहे.

आनंद तिवारी दिग्दर्शित चित्रपट थिएटरमध्ये, १९ जुलैला रिलीज झालेला आहे. या चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून या चित्रपटाला पहिल्या विकेंडला दमदार प्रतिसाद मिळालेला आहे. चित्रपटाला पहिल्या विकेंडला कसा प्रतिसाद मिळतोय जाणून घेऊया...

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टच्या अहवालानुसार, चित्रपटाला पहिल्या विकेंडमध्ये उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. चित्रपटाने तीन दिवसांत ३० कोटींची कमाई केलेली आहे. पहिल्या दिवशी ८.३ कोटी, दुसर्‍या दिवशी १०.२५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ११.१५ कोटींची कमाई केलेली आहे.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून चाहते कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करीत आहेत. चित्रपटाला मिळत असलेला दमदार प्रतिसाद पाहून विकी कौशलसोबतच चित्रपटाच्या इतर टीमलाही आनंद गगनात मावेनासा झालाय.

विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचं 'तौबा तौबा' हे गाणे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही टॉप करत होते. ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्यातील धमाल कॉमेडी पाहून प्रेक्षकांच्या मनातील चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली होती.

इशिता मोईत्रा आणि तरुण दुडेजा यांनी लिहिलेला 'बॅड न्यूज' हा २०१९ च्या 'गुड न्यूज' फ्रेंचाइजी चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सलोनी बग्गा (तृप्ती डिमरी) हीच्या पोटात जुळी मुली आहेत.

मनोरंजक गोष्ट म्हणजे या मुलांना एक नाही तर दोन वडील (विकी आणि एमी) आहेत. आता या दोघांपैकी ती आपल्या मुलाचा बाप म्हणून कोणाची निवड करणार, याभोवतीच ही कथा फिरतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

SCROLL FOR NEXT