Article 370 Film Twitter
मनोरंजन बातम्या

'आर्टिकल 370'ने पहिल्या दिवशी तोडला 'द काश्मीर फाईल्स'चा रेकॉर्ड, जमवला तब्बल इतक्या कोटींचा गल्ला

Article 370 Box Office Collection Day 1: यामी गौतमचा 'आर्टिकल 370' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

Article 370 Day 1 Box Office Collection

यामी गौतमचा (Yami Gautam) 'आर्टिकल 370' चित्रपट (Article 370 Film) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१९ मध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू- काश्मिरमधून 'कलम ३७०' हटवला होता. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Bollywood)

काश्मिरवरील परिस्थितीवर भाष्य करणारा हा दुसरा चित्रपट आहे. 'द काश्मीर फाईल्स' नंतर 'आर्टिकल ३७०' बद्दल प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाला प्री- बुकिंगमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'आर्टिकल 370' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात... (Bollywood Film)

यामी गौतम आणि प्रियामणी राज स्टारर 'आर्टिकल 370' चित्रपटाचं प्रदर्शनापूर्वी पीएम नरेंद्र मोदींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. चित्रपटाचे कौतुक फक्त समीक्षकांनीच नाही तर, प्रेक्षकांनीही केले आहे. Sacnilk च्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'आर्टिकल 370' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुख्य बाब म्हणजे चित्रपटाने विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचा ओपनिंग डेचा रेकॉर्ड मोडित काढला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती. (Bollywood News)

'आर्टिकल 370' हा चित्रपट घटनेतील कलम 370 हटवणे आणि काश्मीरमधील दहशतवाद या विषयावर आधारित आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी कोट्यवधींचा खर्च केलेला आहे. अरुण गोविल, यामी गौतम, प्रियामणी, किरण करमरकर यांच्यासह अनेक कलाकारांनी 'आर्टिकल 370' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

SCROLL FOR NEXT